
अकोला (प्रतिनिधी) –
जिल्ह्यातील अवैध धंद्यांचा पाडाव करण्यासाठी अकोला पोलिसांनी ‘ऑपरेशन प्रहार’ मोहीम सुरू केली असून, या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने आज आलेगाव गावात मोठी कारवाई केली.
गावठी हातभट्टी दारूवर मोठ्या प्रमाणावर रेड करत, एकूण ८०,५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गावठी हातभट्टी दारूवर मोठ्या प्रमाणावर रेड करत, एकूण ८०,५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक मा. श्री. अर्चित चांडक साहेब यांना आलेगाव येथील बिनधास्त सुरु असलेल्या हातभट्टी दारू व वरळी मटक्याच्या अड्ड्यांविषयी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. गावात सतत वाद, भांडणं आणि घरांच्या उध्वस्त होण्यामागे या अवैध धंद्यांचा हात असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. याची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक श्री. शंकर शेळके (स्थानीय गुन्हे शाखा) यांना कारवाईचे आदेश देण्यात आले.
आज दिनांक 06/08/2025 रोजी, एलसीबीचे पथक शासकीय वाहनाने पोलीस स्टेशन चान्नी हद्दीतील डुक्करधरा नाल्यावर छापा टाकण्यासाठी पोहोचले. पंचनामा करून रेड टाकण्यात आली असता,
देवदास सुखदेव तेलगोटे (वय 49, रा. आलेगाव, ता. पातूर, जि. अकोला) हा हातभट्टी तयार करताना रंगेहात आढळून आला.
त्याच्याकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:
गावठी हातभट्टी दारू – ५० लिटर (प्रति लिटर २००/-) – ₹ १०,०००/-
४७ लोखंडी पिप्यातील मोहा सळवा – ७०५ लिटर (किंमत ₹ ७०,५००/-)
एकूण मुद्देमाल – ₹ ८०,५००/-
आरोपीविरुद्ध पो. स्टे. चान्नी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. चंद्रकांत रेड्डी, आणि एलसीबी निरीक्षक श्री. शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली API गोपाल ढोले, HC/अब्दुल मजीद, HC/वासिमोद्दीन, HC/रवी खंडारे, HC/किशोर सोनोने, PC/अशोक सोनोने, HC/प्रशांत कमलाकर या कर्तव्यदक्ष पथकाने केली.