
अकोला – नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली येथील अक्षय भालेराव हत्येप्रकरणी फास्टटॅक कोर्टामार्फत त्वरीत निकाली काढून दोषी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या नेतृत्वाखाली मा. जिल्हाधिकारी अकोला मार्फत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांना निवेदनातून केली.
राज्याचे गृहमंत्री यांना मागणी केलेल्या निवेदनात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने असे म्हटले आहे की, अक्षय भालेराव यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्यामुळे बोंढार हवेली जि. नांदेड येथील गावगुंडांनी अक्षय भालेराव यांची निर्घृण हत्या केली. त्यामुळे या गावातील व परिसरातील सर्व नागरिक दहशतीखाली वावरत आहेत. महाराष्ट्रामध्ये भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून बोंढार हवेली जि. नांदेड येथील अक्षय भालेराव यांच्या हत्याप्रकरण हे फास्टटॅक कोर्टामार्फत त्वरीत कारवाई करून प्रकरण निकाली काढण्यात यावे व या हत्याकांडात दोषी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. आणि या निवेदनाची दखल शासनाने न घेतल्यास संपूर्ण जिल्हाभर आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदनावर, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महा
सचिव मिलींद इंगळे, महिला जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जि. प. अध्यक्ष संगीताताई अढावू, जि. प. उपाध्यक्ष सुनील फाटकर, मनपा माजी गटनेते गजानन गवई, ओबीसी नेते एड. संतोष राहाटे, अत्यंत समाज संघटनेचे अध्यक्ष गोपाल राऊत, माजी जि प. अध्यक्ष पुष्पाताई इंगळे, सह जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विकास सदांशिव, रूग्णसेवक नितीनभाऊ सपकाळ, शिक्षण सभापती मायाताई नाईक, महिला व बाल कल्याण सभापती रिजवाना परवीन, जिल्हा महासचिव शोभाताई शेळके,राहुल अहिरे, मनोहर पंजवाणी, महानगर अध्यक्ष वंदनाताई वासनिक, जिल्हा उपाध्यक्ष कविता राठोड, गजानन दांडगे, दिनकर खंडारे, अशोक शिरसाट, किशोर जामणिक, शरद इंगोले, किशोर वानखडे, पप्पुभाऊ मोरे, आकाश शिरसाट, सुवर्णा जाधव, प्रमोद इंगळे, पराग गवई, वसंतराव नागे, राजकुमार क्षिरसागर, संजय वाडकर, मोहन तायडे, शिलवंत शिरसाट, तेजस्विनी बागडे, शेख मुख्तार, किशोर तेलगोटे, मिलींद करवते,चरण इंगळे, मिनाश्री खंडारे, रेखा अवचार, पुरूषोत्तम अहिर रत्नपाल डोंगरे, आकाश जंजाळ, आकाश गवई, मंदा वाकोडे, माया इंगळे, सरोज वाकोडे, पुष्पलता पांडे, बबनराव सांगळे,सुरेश कलोरे, सुधाकर गवई, मधुकर गोपनारायण, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सह्या केल्या आहेत.