अकोट फाईल अकोला येथील एका धोकादायक इसमावर एमपीडीए’ अंतर्गत कारवाई?

अकोला शहरातील, आंबेडकर चौक, अकोट फाईल येथे राहणारा कुख्यात गुंड पियुष राजु मोरे याचे वर यापुर्वी जबरी चोरी करतांना इच्छापुर्वक दुखापत करणे, पुरवा नष्ट करणे, घातक हत्याराने किंवा साधनांनी इच्छापुर्वक दुखापत पोहचवणे, ईच्छापुर्वक दुखापत पोहोचवणे, बेकायदेशिर जमाव करणे, दंगा करणे, समान उद्दीष्ट साध्य साधण्यासाठी केलेल्या अपराधा बददल बेकायदेशिर जमावाचा प्रत्येक सभासद दोषी असणे, आगळीक करणे, चोरी करणे, बेकायदेशिर रित्या अग्निशस्त्र व शस्त्र बाळगणे, तडीपार आदेशाचे उल्लंघन करणे, सामान्य लोकांच्या मनात दहशत निर्माण करणे, शांतताभंग घडवुन आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचे वर यापुर्वी विवीध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती, परंतु त्याचे वर त्याचा काहीच परिणाम झालेला नव्हता. तो प्रतिबंधक कार्यवाही करून सुध्दा जुमानत नसल्याने त्याचे विरुध्द गंभीर दखल घेण्यात येवुन कुख्यात पियुष राजु मोरे, याचे गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा याकरीता मा. पोलीस अधीक्षक, अकोला यांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. जिल्हादंडाधिकारी, अकोला यांना सादर केला होता. मा. जिल्हादंडाधिकारी, श्री. अजित कुंभार यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच स्वतःचे स्त्रोताव्दारे माहीती मिळवुन सदर कुख्यात गुंड हा धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने त्यास एक वर्षा करीता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश दि.१८/११/२०२४ रोजी पारीत केला.

मा. जिल्हादंडाधिकारी, सा. अकोला यांचे आदेशावरून पियुष राजु मोरे हा अप.क. ५६४/२४ क ३,२५ आर्म अॅक्ट अन्वये वि. न्यायालयीन कोठडी मध्ये असल्याने त्यास जिल्हा कारागृह अकोला येथे सदरचा आदेश तामील करून दिनांक १८/११/२०२४ रोजी जिल्हा कारागृहात स्थानबध्द केले.

सदरची कार्यवाही पूर्ण करण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक, श्री. बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, अभय डोंगरे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सतिश कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक शंकर शेळके, पोउपनि. माजीद पठाण, पोहेकॉ. ज्ञानेश्वर सैरिसे, पोकॉ. उदय शुक्ला, तसेच पो.स्टे. अकोट फाईल येथील पोलीस निरीक्षक अरूण परदेशी, सपोनि बारापात्रे, पोलीस अंमलदार हर्षल श्रीवास, ओम बेनवड, अस्लम शहा यांनी परिश्रम घेतले.

अकोला जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता राहावी याकरीता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत गुन्हेगारांवर येणा-या निवडणुका, आगामी सण उत्सव काळात एमपीडीए व इतर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे” असा इशारा जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.