अकोल्यातील शिल्पा मेश्राम यांची केबीसी मध्ये निवड…

स्थानिक: अकोला मधील तारफाईल येथे रहवासी असणाऱ्या ऑटो रिक्षा चालक प्रशांत मेश्राम यांच्या पत्नी सौ. शिल्पा मेश्राम या आपल्या गुणवत्तेच्या जोरावर सोनी टीव्ही वरील केबीसी कार्यक्रमात त्यांची निवड झाली होती.

शिल्पा मेश्राम यांचे कुटुंब हे अत्यंत गरीब असून पती ऑटो रिक्षा चालक तर स्वतः त्या गृहिणी आहेत. घराची परिस्थिती पाहून आणि मुलांचे भविष्य लक्षात घेत त्यांनी अथक परिश्रम घेतले आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर केबीसी सारख्या मोठ्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध सिने अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या पुढे बसून अत्यंत निर्भिडपणे अभ्यासू वृत्तीने प्रश्नांची उत्तरे देत तब्बल 12 लाख 50 हजार बक्षीस जिंकून आपली बुद्धिमत्ता दाखवून दिली. ही बाब अकोला जिल्ह्यासाठी अत्यंत अभिनंदनाची आहे.

ज्ञान आणि बुद्धिमत्तेवर कुणाची मक्तेदारी नसते. परिश्रम घेतले की ती कुणालाही प्राप्त होऊ शकते हे आज शिल्पा मेश्राम यांनी सिद्ध करून दाखवले आहे. स्वतः चा संसार सांभाळत हे सर्व करणे सोपे नव्हते. पण मला ही दयनीय परस्थिती बदलायची होती कारण माझ्यापुढे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श होता. असे मत त्यांनी व्यक्त केले. आज समाजाच्या विविध स्तरावरून शिल्पा मेश्राम आणि त्यांच्या कुटुंबाचे अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.