
वंचित बहुजन महिला आघडीच्या वतीने जिल्हा व महानगराच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न…

स्थानिक : अकोला येथील प्रमिलाताई ओक हॉल येथे वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हा व महानगराच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते.
तेव्हा प्रमुख उपस्थितित वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी उपस्थित सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संबोधित करतांना आज वंचित बहुजन आघाडी अकोल्यात जेवढ्या ताकदिने उभी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात उभी करण्यासाठी अकोल्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी झटले पाहिजे असे प्रतिपादन केले. पुढे बोलताना ते म्हणाले की सत्काराच्या औपचारिक्तेला बाजूला सारून विचार मंथन करून पुढील वाटचाल केली पाहिजे. फुले आंबेडकरी विचारधारा पुढे घेवून जाण्याचा प्रयत्न सातत्याने वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात केला आहे त्या विचारानेच आपण प्रयत्नशील राहले पाहिजे.

तेव्हा नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, व चार सभापती यांचा महिला आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश महिला महासचिव अरूंधतीताई शिरसाट, प्रमुख उपस्थिती युवा प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, पश्चिम विदर्भ महासचिव बालमुकुंद भिरड, वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, भारिपचे जिल्हाध्यक्ष प्रदिप वानखडे, महिला जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, जिल्हा महासचिव मिलिंदभाऊ इंगळे, महिला जिल्हा महासचिव शोभाताई शेळके, निलोफर शहा, प्रतिभाताई अवचार, निताताई गवई, प्रमोदिनी कोल्हे, प्रतिभाताई भोजने, आकाश शिरसाट, संगीताताई खंडारे, किरणताई बोराखडे, मंदाताई शिरसाट, सरपंच वैशालीताई विकास सदांशिव, शंकरराव इंगळे, कलीम खा पठाण, आशिष मांगुळकर, जय तायडे, सत्कारमूर्ती जिल्हा परिषद अध्यक्ष सौ संगीताताई अढावू, उपाध्यक्ष सुनिल फाटकर, जि. प. समाजकल्याण सभापती आम्रपाली खंडारे, महिला व बालकल्याण सभापती रिजवाना परवीन, विषय समीती सभापती सौ योगीताताई रोकडे, विषय समीती सभापती सौ. मायाताई नाईक, तेल्हारा पंचायत समिती सभापती अम्रपाली गवारगुरू, मुर्तिजापूर पंचायत समिती सभापती अम्रपाली तायडे, बाळापूर पंचायत समिती सभापती सोनटक्केताई, पातुर सभापती टप्पेताई, उपसभापती अकोला अजय शेगावकर,
प्रास्ताविक महिला महानगर अध्यक्ष सौ. वंदनाताई वासनिक आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुवर्णाताई जाधव यांनी तर आभारप्रदर्शन महिला महासचिव प्रा. मंतोषताई मोहोळ यांनी केले.