अकोल्यात बी आर शिरसाट यांच्या स्मृतिदिनानिमित्त जाहीर व्याख्यान

भारिप बमसंच्या अकोला पॅटर्नचे शिलेदार दिवंगत बी आर शिरसाट यांच्या पंधराव्या स्मृतिदिनानिमित्त जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी स्मृतिदिनानिमित्त वैचारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. यावर्षी ‘फुले आंबेडकरी चळवळीची पुनर्मांडणी’ हा व्याख्यानाचा विषय असून औरंगाबादचे ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत तथा साहित्यिक प्रा‌‌.डॉ. संजय मून हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

याप्रसंगी प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, अरुंधती शिरसाट, राजेंद्र पातोडे, विश्वनाथ शेगावकर, प्रा. संतोष हुशे, प्रमोद देंडवे, प्रदीप वानखडे, पुष्पाताई इंगळे, बालमुकुंद भिरड, मिलिंद इंगळे, संतोष रहाटे भास्कर भोजने, प्रा. भारत शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून नवनिर्वाचित जि.प. अध्यक्षा संगीता आढाऊ, उपाध्यक्ष सुनील पाटकर, समाज कल्याण सभापती आम्रपाली अविनाश खंडारे, महिला व बालकल्याण रिजवाना परवीन शेख, सभापती योगिता मोहन रोकडे, माया संजय नाईक, पं.स. सभापती आम्रपाली गवारगुरु, सुनीता टप्पे, शारदा सोनटक्के, आम्रपाली तायडे, उपसभापती किशोर मुंदडा, इमरान खान, राजकन्या कवळकार, अजय शेगावकर या नवनिर्वाचित पदाधिका-यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि. ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी होणा-या जाहीर व्याख्यानाचे स्थळ प्रमिलाताई ओक हॉल, अकोला असून वेळ दुपारी १२.०० वा. राहील. अकोल्यात होणा-या वैचारिक कार्यक्रमाला जास्तीत संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन स्मृतिदिन समितीच्या वतीने अमोल शिरसाट यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.