भारतीय माजी सैनिक संघटना मुंबई राज्य कार्यकारिणी च्या उपाध्यक्ष पदी अकोल्याचे विष्णू डोंगरे विजयी

मुंबई:

भारतीय माजी सैनिक संघटना मुंबई ‌कडुन पुणे येथे दि.२२ डिसेंबर रोजी मुंबई राज्य कार्यकारिणीची निवडणूक संपन्न झाली. या निवणुकीमध्ये विविध पदासाठी निवड प्रक्रिया घेण्यात आली. त्यामधे उपाध्यक्ष पदाकरीता ७ महार रजिमेंटचे सेवानिवृत्त विष्णू डोंगरे उभे होते. तेव्हा अटितटीची लढत पाहायला मिळाली. या लढतीमध्ये अकोल्याचे विष्णू डोंगरे साहेब व अरुण तळीखेडे साहेब यांनी म्हाडीक साहेबांवर दणदणीत विजय मिळवला. या विजयाचा सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात आला. त्यामुळे विष्णू डोंगरे साहेब व अरुण तळीखेडे साहेब यांचे भारतीय माजी सैनिक संघटना अकोला जिल्हा ‌कडुन हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.

भारतीय माजी सैनिक संघटना मुंबई ‌‌राज्य कार्यकारिणी निवडणूकीचा संपुर्ण निकाल खालील प्रमाणे…

अध्यक्ष: गोपाळ वानखेडे साहेब
उपाध्यक्ष: अरुण तळीखेडे साहेब
उपाध्यक्ष: विष्णू डोंगरे साहेब  
सचिव: बिलेवार साहेब
सहाय्यक सचिव: फुलचंद पाटील साहेब
खजिनदार: विश्वेश्वर सोनवणे साहेब
इ. सी. सदस्य: दीपक राऊळ साहेब
इ. सी. सदस्य: मनसुख वाबळे साहेब 
इ. सी.सदस्य: अशोक नागराळे साहेब

Leave a Reply

Your email address will not be published.