अकोला(प्रतिनिधी): संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेध आंदोलन करण्यात आले. पक्ष प्रदेशाध्यक्ष मनोजदादा आखरे यांच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन करण्यात आले असून, अकोल्यात जिल्हाध्यक्ष ॲड. नमन पाटील आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घेणे, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत, तसेच कांदा, कापूस, सोयाबीन, धान यांसह सर्व शेतमालाला हमीभाव जाहीर करण्याच्या मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.
या आंदोलनाला मराठा सेवा संघाचे केंद्रीय कोषाध्यक्ष अशोकराव पटोकार व संभाजी ब्रिगेडचे अमरावती विभागीय कार्याध्यक्ष गणेश अंदुले यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
आंदोलनावेळी आकाश कराळे, फिरोझ खान, ऋषभ काळे, सूरज महले, प्रदीप कदम, संदीप उपरवट, मंगेश अंधारे, गोपाल घुंगड, ज्ञानेश्वर ताले, बाबूलाल डोंगरे, सागर काळमेघ, नंदू सुरडकर, प्रशांत पोहरे, संतोष वक्ते, पंकज हरणे, आलोक अबगड, डॉ. शकील, सोपान उजाडे, ओम नारखेडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
👉 या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठी गजबज निर्माण झाली होती.

