
अकोला, ९ मे २०२५:
अकोल्यातील मुसा कॉलनी परिसरात ‘गांजा कार’वर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. एका चारचाकी वाहनातून तब्बल १२ किलो ८० ग्रॅम गांजा आणि टाटा एरिया कार असा एकूण १४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मुसा कॉलनी, मोहता मिल रोडवरील एका प्लॉटवर छापा टाकला असता, राजीक खान लतीफ खान (वय २६) या तरुणाने आपल्या मालकीच्या गाडीच्या डिक्कीत गांजा लपवून ठेवल्याचे उघड झाले. पोलिसांनी गांजा व चारचाकी वाहन ताब्यात घेत आरोपीला अटक केली.
एन.डी.पी.एस. अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीस रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह आणि अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. शंकर शेळके, स.पो.नि. विजय चव्हाण, पो.उप.नि. माजीद पठाण व त्यांच्या चमूने संयुक्तपणे केली.