अकोल्यात बांधकाम मजुरांचा भव्य धरणा आंदोलन – कल्याणकारी योजना बंद करण्याविरोधात संतापाचा ज्वालामुखी!

अकोला : “श्रमिक हिताय – श्रमिक सुखाय” या घोषणांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. बांधकाम मजुर संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि. १२ ऑगस्ट) इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या योजना टप्प्या-टप्प्याने बंद करण्याविरोधात भव्य धरणा आंदोलन छेडण्यात आले. सकाळी ११ वाजता सुरू झालेले हे आंदोलन दुपारी २ पर्यंत सुरू राहिले.

असंघटित बांधकाम मजुरांना कल्याणकारी योजना आणि नोंदणी-नुतनीकरणातील जाचक अटींमुळे वंचित ठेवले जात असल्याने संतप्त मजुरांनी “मजुर हिताच्या योजना तात्काळ सुरू करा”, “ग्रामसेवकांनी ९० दिवसांचे प्रमाणपत्र द्या”, “कायम स्वरुपी सहा. कामगार आयुक्त द्या” अशा जोरदार घोषणा दिल्या.

आंदोलनात पुढील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या —
1️⃣ अकोल्यात कायम स्वरुपी सहा. कामगार आयुक्त नेमणे.
2️⃣ ग्रामसेवकांकडून ग्रामीण मजुरांना ९० दिवसांचे प्रमाणपत्र देणे.
3️⃣ बंद करण्यात आलेल्या मजुर हिताच्या योजना तातडीने पुन्हा सुरू करणे.
4️⃣ प्रलंबित प्रकरणे वेळेत निकाली काढणे.
5️⃣ नोंदणीकृत लाभार्थ्यांना गृहोपयोगी व सुरक्षा संच वाटप करणे.

“मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करू”, असा इशारा संघटनेच्या नेत्यांनी दिला.

या आंदोलनात शैलेश सुर्यवंशी, बाबुलाल डोंगरे, संदिप खंडारे, प्रविण खंडारे, सुनिल वानखडे, प्रेम वानखडे, पंचशिल गजघाटे, अनुराधा ढिसाळे, दिनेश डोंगरदिवे यांसह शेकडो मजुर कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर घोषणाबाजीने दणाणून गेला होता.

Leave a Reply

Your email address will not be published.