अकोल्यात अवैध जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक! सहा आरोपी अटकेत, दोन लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

अकोला | २८ मे २०२५ –
अकोल्याच्या गुन्हेगारी विश्वात खळबळ उडवणारी कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील आलेगाव येथे सुरू असलेल्या वरली मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून सहा जणांना रंगेहात अटक केली आहे. कारवाईदरम्यान सुमारे २.१४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पोलिसांच्या अचूक नियोजनामुळे अवैध धंद्याला मोठा दणका बसला आहे.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. अर्चित चांडक यांच्या सूचनेवरून व पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हे संपूर्ण ऑपरेशन अतिशय कौशल्याने पार पाडले.

जप्त मुद्देमालामध्ये समावेश:

वरली मटका खेळण्याचे साहित्य

रोख ₹२६,२९०

तीन मोटारसायकली – अंदाजे किंमत ₹१,६०,०००

तीन मोबाईल – ₹२१,०००

प्लास्टिक खुर्च्या व पाण्याचे कॅन – ₹७,०००
एकूण मुद्देमाल – ₹२,१४,२९०

अटक करण्यात आलेले आरोपी:

१. गणेश ज्ञानदेव देऊळकर (५२), माळीपुरा, आलेगाव
२. तल्यारखा कालेखा (६४), वंजारी पूर, आलेगाव
३. सय्यद इमरान सय्यद ख्वाजा (४०), सरकारी दवाखाना, आलेगाव
४. राहुल देवेंद्र सरकटे (४४), आंबाशी, ता. पातुर
५. प्रफुल्ल शालिग्राम जाधव (३५), भेंडी महाल, ता. बार्शी टाकळी
६. विष्णू आनंदा तिवाले (४९), उंबरवाडी, ता. पातुर

सर्व आरोपींविरुद्ध चान्नी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोलीस प्रशासनाची ठाम भूमिका

नवनियुक्त पोलीस अधीक्षक मा. अर्चित चांडक यांनी रुजू होताच सर्व ठाणेदारांना स्पष्ट आदेश दिले होते की, कोणताही अवैध व्यवसाय खपवून घेतला जाणार नाही. त्यानुसार आलेगावमधील ही कारवाई केली गेली. भविष्यातही अशा अवैध धंद्यांवर प्रखर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, पो.नि. शंकर शेळके, पो.उप.नि. माजीद पठाण तसेच अंमलदार सुलतान पठाण, रवि खंडारे, महेंद्र मलिये, शेख वसीम, प्रशांत कमलाकर आणि अशोक सोनवणे यांच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वी झाली.

Leave a Reply

Your email address will not be published.