अकोल्यात पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता — हवामान विभागाचा इशारा

३० जून ते ४ जुलैदरम्यान सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

अकोला, दि. ३० (प्रतिनिधी) – अकोला जिल्ह्यात आजपासून पुढील चार दिवस म्हणजेच ३० जून ते ४ जुलै २०२५ दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, अकोला आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि वीजांपासून धोका संभवतो.

🌩️ सावधगिरीसाठी महत्त्वाच्या सूचना:

वीज व मुसळधार पावसाच्या वेळी झाडाखाली थांबू नका

नाल्यांमधून किंवा अंडरपासमधून प्रवास टाळा

सखल भाग, खड्डे व पाणी साचलेली ठिकाणे टाळा

पूरग्रस्त भागातील पुलांवरून वाहन चालवू नका

जनावरे वीज खांब किंवा झाडांखाली बांधू नका

वीज चमकत असताना मोबाईल आणि विजेची उपकरणे बंद ठेवा

वाहने वीजेच्या खांबांपासून दूर ठेवा

📲 ‘दामिनी’ अ‍ॅप डाऊनलोड करा — वीज कोठे पडणार आहे याची तत्काळ माहिती मिळवा!

⛈️ प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले असून, स्थानिक यंत्रणा सज्ज आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.