१५ वर्षीय मुलगी अचानक बेशुद्ध… रणजीत वाघ, प्रीती वाघ, योगिता वंजारी यांच्या तत्परतेमुळे वाचला जीव!

अकोला – अकोला पोलीस दलाच्या वतीने “Run for Drugs Free India” या अभियानांतर्गत दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 6.30 वा. पोलीस मुख्यालय, अकोला येथे 3 किमी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शेकडो धावपटूंनी सहभाग नोंदवला.
मात्र, या शर्यतीदरम्यानच एक धक्कादायक प्रकार घडला. १५ वर्षीय मुलगी अचानक श्वास घेण्यास त्रास होऊन जमिनीवर कोसळली. काही क्षणांसाठी वातावरणात भीती पसरली.
मात्र,रणजीत वाघ, प्रीती वाघ आणि योगिता वंजारी या समाजसेवकांनी दाखवलेली मानवी संवेदनशीलता जीवनदायी ठरली. तिघांनीही वेळ न दवडता मुलीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू करताच मुलीचा जीव वाचला.
👉 या प्रसंगानंतर उपस्थितांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या धाडसी कृतीचं कौतुक करत “गरजेच्या क्षणी दिलेली मदत म्हणजेच खरी मानवता” असे म्हटले.