
स्थानिक: अकोला जिल्हा परिषद पोटनिवडनुक तालुका-अकोट चोहटा बाजार सर्कल येथे नुकतीच पोटनिवडणूक पार पडली. त्यात वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवारवंचित बहुजन युवा आघाडीचे चोहट्टा बाजार सर्कल अध्यक्षयोगेश पंजाबराव वडाळ हे 3781 मते घेउन विजयी झाले. तब्बल 1394 मताची आघाडी घेत दणदणीत विजयाची पताखा फडकवली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे गजानन मोतीराम नळे हे 2387 मते घेवून दुसऱ्या स्थानावर तर प्रहार जनशक्ती पक्षाचे जीवन रामकृष्ण खवले हे 1765 मते घेवून तिसऱ्या स्थानावर आहे. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा तथा राज्य पदाधिकारी यांच्या मेहनतीला यश आल्याचे बोलल्या जात आहे.
