वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रध्देय अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचितचे अकोला जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ देंडवे व जिल्हा महासचिव मिलिंदभाऊ इंगळे यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील कट्यार व अंबिकापुर ओबीसी बांधवांनी वंचित बहुजन आघाडीत जाहिर प्रवेश केला. गंगाधर इंगळे, भगवान चक्रनारायण देवलाल चक्रनारायण राजेश चक्रनारायण शुभम इंगळे पंजाबराव इंगळे राजेश पंजाब शरद इंगळे अजय चक्रनारायण वानखडे चिंतामण चक्रनारायण अनिल धांडे जय गोपाल ठाकरे कट्यार रामकृष्ण सोळंके साहेबराव खांडेकर प्रवीण ढोरे दीपक संजय वाहूर वाघ अंबादास वाहूर वाघ राहुल शिरसाट अजय तेलगोटे रामसिंग सोळंके शुभम गवई राजेश सोळंके बाळू देशमुख रघुनाथ ठाकरे दिगंबर तेलगोटे या ओबीसी बांधवांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला.
या प्रवेशाच्या वेळी जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ देंडवे व जिल्हा महासचिव मिलिंदभाऊ इंगळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अकोला पश्चिम तालुकाध्यक्ष देवराव राणे, अकोला पुर्व तालुकाध्यक्ष किशोर जामनिक, गटनेते गजानन गवई, प्रा. सुरेश मोरे सर, ता. संघटक शंकरराव राजुस्कर, ता. प्रसिद्धी प्रमुख मोहनभाऊ तायडे माजी उपसभापती आनंद डोंगरे, रामकृष्ण डोंगरे उर्फ सावकार, देवानंद तायडे, संजय किर्तक, प्रदिप उर्फ बबलु शिरसाट, मधुकर गोपणारायण आदी पदाधिकारी उपस्थित होते.