अकोला क्रीडा प्रबोधिनी व जिल्हा प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंचा राज्यात दबदबा कायम

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तर शालेय बॉक्सींग क्रीडा (१४/१७/१९ वर्षाआतील मुले व मुली) स्पर्धा सन २०२४-२५ चा प्रांरभ दि.२२ नोव्हेंबर २०२४ रोजी १४ वर्षाआतील मुले खेळाडूंव्दारे करण्यात आला. सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील एकुण ९ विभाग मिळून ५८५ खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन मा. जिल्हाधिकारी, अकोला श्री. अजित कुंभार यांचे व्दारे दि.२४/११/२०२४ रोजी करण्यात आले. स्पर्धेप्रसंगी १४ वर्षाआतील मुले, १७ वर्षाआतील मुले व मुली यातील विजयी खेळाडूंना प्राविण्य पदक देवून गौरवांन्वीत करण्यात आले. दिल्ली येथे होणाऱ्या ६८ वी राष्ट्रीय बॉक्सीग क्रीडा स्पर्धेकरीता क्रीडा प्रबोधिनी, जिल्हा प्रशिक्षण केंद्र व के.आय.सी चे असे एकुण २२ खेळाडूची निवड झाली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. सतीशचंद्र भट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रशिक्षक म्हणून श्री. आदित्य मने, श्री. गजानन कबीर, श्री. योगेश निशाद, डॉ. पठाण यांनी काम पाहिले. अकोला जिल्ह्यातील विजयी खेळाडू खालील प्रमाणे.१४ वर्षाआतील खेळाडूंचे नावे संस्कार अत्राम (३२-३४) सुवर्ण पदक, जयेश कुंभार (३८-४०) सुवर्ण पदक, साई संद्री (२८- ३०) रजत पदक, जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे खेळाडू वेदांत पवार (४०-४२) सुवर्ण पदक, क्रीश मकोरीया (४२-४४) सुवर्ण पदक, अंश धकाते (३४-३६) सहभाग,१७ वर्षाआतील खेळाडूंचे नावे क्रीडाप्रबोधिनी संघ स्मित राजपूत (५०-५२) सुवर्ण पदक, रिजवान शाह (५२-५४) सुवर्ण पदक, अथर्व भट (६६-७०) सुवर्ण पदक, गोपाल गणेशे (४६) रजत पदक, गौरव दिक्षीत (४६-४८) रजत पदक, पार्थ चोपडे (४८-५०) रजत पदक, शास्वत महल्ले (५४-५७) रजत पदक, शिवराज देशमुख (५७-६०) रजत पदक, हर्षदिप जाधव (४६- ४८) कास्य पदक, रितेश करंगामी (४८-५०) कांस्य पदक, आदित्य तायडे (५२-५४) कांस्य पदक, ऋषिकेश चव्हाण (८० वरील) कांस्य पदक, जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे खेळाडू मोहम्मद सोहराब (६६-७०) रजत पदक, मोईनुल्ला खान (८० वरील) रजत पदक, अरुण दुबे (६३-६६) कांस्य पदक, कार्तिक खानझोडे (५८-६०) कांस्य पदक,१७ वर्षाआतील मुली :- क्रीडा प्रबोधिनी संघ समिक्षा सोळंखे (४४-४६) सुवर्ण पदक, सुहानी बोराडे (४८-५०) सुवर्ण पदक, गार्गी राऊत (५४-५७) सुवर्ण पदक, निवेदिता भुतडा (५७-६०) सुवर्ण पदक, भक्ती चुंगडे (७५-८०) सुवर्ण पदक, इशिका झांबरे (-४२) रजत पदक, अनुष्का गुप्ता (५२-५४) रजत पदक, अदिती कढाणे (४२-४४) कांस्य पदक, श्रध्दा खोब्रागडे, (४६-४८) कांस्य पदक, खेलो इंडिया सेंटर भक्ती कावळे (५७-६०) रजत पदक, वेदश्री गोतमारे (८० वरील) रजत पदक, मोक्षदा राऊत (५०-५२) कास्य पदक,१९ वर्षाआतील मुले : क्रीडा प्रबोधिनी तनिष बुंदेले (४६) सुवर्ण पदक, शोएब गाडेकर (४६-४९) सुवर्ण पदक, रविंद्र पाडवी (४९-५२) सुवर्ण पदक, चेतन अंभोरे (५२-५६) सुवर्ण पदक, रेहान शाह (५६-६०) सुवर्ण पदक, कनक खंडारे (६४- ६९) सुवर्ण पदक, मोहम्मद फेज मोरवाले (६९-७५) सुवर्ण पदक, विवेक तायडे (४६) रजत पदक, बेंदाग महागणकर (४६० ४९) रजत पदक, स्वणीम सिंग (४९-५२) रजत पदक, रेहान हुसेन (५६-६०) रजत पदक, प्रणव सिरसाट (६०-६४) कास्य पदक, जिल्हा प्रशिक्षण केंद्र जय उचाडे (५२-५६) कास्य पदक, राम राऊत (७५-८१) कांस्य पदक,१९ वर्षाआतील मुली पलक झांबरे (४८-५१) सुवर्ण पदक, रेवती उंबरकर (५७-६०) सुवर्ण पदक, पुर्वी गावंडे (६४-६६) सुवर्ण पदक, हर्षदा भाकरे (४५) रजत पदक, जिल्हा प्रशिक्षण केंद्र व खेलो इंडिया सेंटर दिपीका नायक (६९-७५) रजत पदक, वरील खेळाडूंव्दारे अकोला जिल्ह्याकरीता राज्यस्तर शालेय बॉक्सींग क्रीडा स्पर्धेत पदकांची कमाई करण्यात आली. समारोपीय स्पर्धा कार्यक्रम दि.२७/११/२०२४ रोजी सायंकाळी ७.०० वाजता जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थीक विकास महामंडळच्या श्रीमती वर्षा खोब्रागडे यांच्या उपस्थितीत पार पडला. समारोपीय कार्यक्रमात सर्व सुवर्ण पदक, रजत पदक व कांस्य पदक प्राप्त खेळाडूंना मेडल देवून सन्मानीत करण्यात आले. मा. जिल्हाधिकारी, अकोला श्री. अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली सदर स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. बॉक्सींग क्रीडा स्पर्धेकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी अथक परिश्रम केले. स्पर्धेतील तांत्रीक बाजू ही जिल्हा क्रीडा अधिकारी श्री सतीशचंद्र भट, विजय डोबाळे क्रीडा मार्गदर्शक चंद्रपुर, अक्षय टेभुर्णीकर क्रीडा मार्गदर्शक वाशिम व त्यांच्या चमुने सांभाळली. स्पर्धेतील सर्व विजयी खेळाडूंचे जनसामान्यातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.