अकोला: दिनांक १९.०८.२०२४ रोजी सकाळी ११.०० वा. रक्षाबंधन सणाचे निमीत्याने पोलीस अधीक्षक कार्यालय
विजय हॉल येथे, सामाजिक रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये गाडगेबाबा सामाजिक
प्रतिष्ठान, आनंद आश्रम, शिवाजी कॉलेज येथील एन.एस.एस., एन. सि.सि., तसेच ग्रामगीता विचार युवा मंच, अस्तित्व
फाउंडेशन, यातील सभासदांनी पोलीस विभागासी समन्वय साधत सामाजिक रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन केले
होते. सदर कार्यक्रम पोलीस अधीक्षक, श्री. बच्चन सिंह पोलीस अधीक्षक, अकोला यांच्या अध्यक्षते खाली, श्री. अभय डोंगर अपर पोलीस अधीक्षक अकोला, डॉ. श्री. रामेश्वर भिसे प्राचार्य शिवाजी कॉलेज अकोला, डॉ. श्री. संजय तिडके, डॉ श्री. रामेश्वर बरगट ग्रामगीता विचार युवा मंच, डॉ. श्री आनंद काळे एन.सी.सी. समन्वयक, डॉ आश्विनी बलोदे, आंनद आश्रम घ्या संचालीका तपोधरी दिदी, यांच्या प्रमुख उपस्थिती होती.
आंनद आश्रम येथील सर्वात लहान बालीकांच्या हस्ते मा. पोलीस अधीक्षक, यांना राखी बांधुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली, त्यानंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले, अकोला पोलीस दल सर्वसामान्यां करीता सुरक्षा कवच म्हणुन अहोरात्र कार्यरत असते, त्याचे मुळे आपल्या मनामध्ये सुरक्षीततेची भावना तयार झाली आहे. जो आपली सुरक्षा करतो त्यावे सोबत नेहमी आपले एक जिव्हाळयाचे नाते असते पोलीस सुदधा त्याचाच एक भाग आहेत. म्हणुन पोलीस विभागासोबत सामाजिक रक्षाबंधनाचे आयोजन केले आहे असे मत डा. श्री. रामेश्वर भिसे यांनी व्यक्त केले. पोलीस विभाग सर्वतोपरी सुरक्षा प्रदान करण्यासाठी कटीबध्द आहे, रक्षाबंधन निमीत्यांने सर्व अकोलेकर यांना शुभेच्छा दिल्या उपस्थित सर्वाना भेट वस्तु देवुन आभार व्यक्त केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता प्र. पोलीस उपअधीक्षक (गृह) श्री. विजय नाफडे, श्री गणेश जुमनाके राखीव पोलीस निरीक्षक, श्री साबळे रा. पोउपनि, यांनी मेहनत घेतली तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री रोहन बुंदेले यांनी केले. सुत्र संचालन पोलीस हवालदार श्री. गोपाल मुकुंदे यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व सामाजिक, शैक्षणीक, संस्था सभासद यांची उपस्थिती होती.