
अकोला जिल्हा घटकातील पोलीस स्टेशनला NDPS ACT 1985 कायदयाअन्वये गुन्हे दाखल करून त्यामध्ये जप्त करण्यात आलेला अंमली पदार्थ मुद्देमाल गांजा, अफु, चरस, एमडी ईत्यादी (ड्रग) जप्त करून मा. सर्वोच्य न्यायालय यांचे निर्देशानुसार अंमली पदार्थ मुद्देमालाची सुरक्षा व साठवणुक करीता पोलीस मुख्यालय, अकोला येथे केंद्रीय अंमली पदार्थ गोडावुन तयार करण्यात आले असुन जिल्हयातील पोलीस स्टेशनला जप्त करण्यात आलेला मुद्देमाल (ड्रग) सदर गोडावुन मध्ये जमा करण्यात येतो.
मा. पोलीस अधीक्षक सा.श्री. बच्चन सिंह यांनी प्रलंबित अंमली पदार्थ मुद्देमाल चा आढावा घेवुन अंमली पदार्थ मुद्देमाल विल्हेवाट करण्याबाबत सुचना देण्यात आले होते. त्याअनुषंगाने अंमली पदार्थ गोडावुन पोलीस मुख्यालय, अकोला येथे जमा करण्यात आलेल्या वेगगळया पोलीस स्टेशनचा ४१ गुन्हयांतील जप्त मुद्देमाल विल्हेवाट करण्याबाबत मा. न्यायालयाची परवानगी घेवुन मुद्देमाल विल्हेवाट प्रक्रीया सुरू करण्यात आली.
अंमली पदार्थ (ड्रग) ४१ गुन्हयांतील मुद्देमाल विल्हेवाट करण्याची महाराष्ट्र प्रदुषण नियत्रंन मंडळ, मुंबई यांची अंमली पदार्थ मुद्देमाल विल्हेवाट करण्याची परवानगी घेवुन तसेच Chief Controller, Government Opium & Alkaloid factories, Delhi येथिल हेडक्वॉटर ची परवागनी घेवुन तसेच मा. सर्वोच्य न्यायालय यांचे निर्देशानुसार कायदेशीर प्रकीया पुर्ण करून दिनांक २५/०३/२०२५ रोजी महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड, बुटीबोरी औद्योगिक क्षेत्र मौजा मांडवा जिल्हा, नागपुर या ठिकाणी ड्रग डिस्पोजल कमीटी सदस्य तथा अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे, पोलीस निरीक्षक श्री. तपन कोल्हे प्रभारी पोलीस उपअधीक्षक (मुख्या) अकोला ड्रग डिस्पोजल कमीटी सदस्य, पोलीस निरीक्षक श्री. शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा, अकोला, दोन शासकीय पंच, व्हिडोओ ग्राफर, महाराष्ट्र प्रदुषण नियत्रंण मंडळ, अकोलाचे उपप्रादेशिक अधिकारी, श्री. महेश भिवापुरकर तसेच महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड, बुटीबोरी नागपुर येथिल कंपनीचे युनिट हेड श्री. प्रशांत मस्के, कंपनीचे कामगार व स्थानिक गुन्हे शाखा, अकोला येथिल पोलीस अंमलदार यांचे उपस्थितीमध्ये ४१ गुन्हयांतील जप्त मुद्देमाल (ड्रग) १६५ किलो १२० ग्रॅम वजनाचा मुद्देमाल रोटरी ईन्सिनरेटर मध्ये जाळुन नष्ट करण्यात आला आहे.