
अकोला: अनैतिक मानव वाहतूक प्रतिबंधक कक्षाने महिला व बाल अत्याचार प्रकरणांवर जोरदार कारवाई केली आहे. अकोला पोलिसांनी एक दिवसात १२२ गुन्ह्यांची उघडकी केली असून, पिडीत मुलगी व आरोपी उज्जैन, मध्यप्रदेशहून ताब्यात घेण्यात आले.
पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन, अकोला येथे कलम ३६३ व ३७० भादवि नुसार गुन्हा नोंदविला होता. तपास दिनांक ०३/०२/२०२५ पासून सुरू होता. सुरुवातीला पिडीत व आरोपी यांचा शोध मुंबई, पुणे आणि साताऱ्यात घेतला, पण ते मिळाले नाहीत.
गुप्त माहितीच्या आधारे तपासकांनी उज्जैन, मध्यप्रदेश येथे शोध घेतला आणि विदुर्गादास मार्ग, गोणसा दरवाजा परिसरात दोघांना ताब्यात घेतले. चौकशीसाठी पोलीस स्टेशन जिवाजीगंज, उज्जैन येथे आणले आणि नंतर अकोला पोलीस स्टेशनला सुपूर्द केले.
या कारवाईमध्ये अनैतिक मानव वाहतूक कक्षाचे अधिकारी कविता फुसे, सुरज मंगरूळकर, प्रदीप उंबरकर, पुनम बचे, तसेच वाहन चालक भागवत काळे व सचिन गायकवाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
अकोला पोलिसांच्या माहितीनुसार, इतर गुन्ह्यांमध्येही पिडीत मुली व आरोपींचा कसून शोध घेऊन निपटारा करण्याचे काम सुरू आहे.