अकोला पोलीस दलाचा नागरिकांसाठी एक अभिनव उपक्रम – “अकोला पोलीस व्हॉट्सअॅप चॅटबॉट!”……

अकोला पोलीस दलाचा नागरिकांसाठी एक अभिनव उपक्रम “अकोला पोलीस व्हॉट्सअॅप चॅटबॉट!” आता पोलिसांशी संवाद होणार अधिक सोपा, जलद आणि आधुनिक! राहणीमान, तक्रारी, माहिती आणि सेवा… सर्व काही एका क्लिकवर ! पोलीस तुमच्या बोटांच्या टोकावर – 24×7 उपलब्ध !

मा. मुख्यमंत्री १०० दिवस कृती आराखडा कार्यक्रम अंतर्गत राहणीमान, तक्रारींचे निवारण, कामाच्या ठिकाणी सुविधा संबंधीत उपक्रम तसेच स्मार्ट पोलीसींग अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत, अकोला पोलीस दल आता नागरिक आणि पोलीस यांच्यातील संवाद अधिक सुलभ, जलद आणि सोयीस्कर करण्यासाठी एक नवीन डिजिटल माध्यम घेऊन आले आहे अकोला पोलीस व्हॉट्सअॅप चॅटबॉट! या आधुनिक सुविधेमुळे नागरिकांना आता पोलीसांकडून पुरविल्या जाणार्या विविध सेवा आणि सुविधा विषयी माहिती मिळवणे अधिक सोपे होणार आहे.

आज दिनांक ११/०४/२०२५ रोजी दुपारी ०४ वाजता विजय हॉल येथे मा. श्री. बच्चन सिंह पोलीस अधीक्षक अकोला यांचे हस्ते शुभहस्ते अकोला पोलीस व्हॉट्सअॅप चॅटबॉट! चे अनवारण करण्यात आले. नागरीकांच्या सेवेत अकोला पोलीस दला चे हे एक सकारात्मक पाउल असणार आहे असे मत पोलीस अधीक्षक यांनी व्यक्त केले.

सदर अकोला पोलीस व्हॉट्सअॅप चॅटबॉट चा वापर कसा करावा याबाबत माहीती देण्यात आली. हे चॅटबॉट वापरण्यास अत्यंत सोपे आहे! आपल्या मोबाईलमधील व्हॉट्सअॅप उघडा. ९४०४६९१०२२ हा क्रमांक आपल्या संपर्क यादीत सेव्ह करा. सेव्ह केलेल्या क्रमांकावर ‘नमस्कार’ / Hello / Hi असा मेसेज पाठवा, मेसेज पाठवताच, हा चॅटबॉट तुम्हाला भाषा निवडण्याचा पर्याय देईल. आता तुम्ही मराठी किंवा इंग्रजी भाषेतून माहिती मिळवू शकता. भाषा निवडल्यानंतर, तुम्हाला विविध प्रकारच्या सेवा आणि सुविधांची यादी दिसेल. उदाहरणार्थ जर तुम्हाला अकोला पोलिसांबद्दल माहिती हवी असेल, तर तुम्ही ‘१’ हा पर्याय निवडा. आपत्कालीन संपर्क क्रमांकांसाठी ‘२’ हा पर्याय निवडा. याचप्रमाणे, इतर विविध सेवांच्या माहितीसाठी संबंधित आकडे निवडून तुम्ही ‘अकोला पोलीस व्हॉट्सअॅप बॅटबॉट’ चा उपयोग करू शकता ।

अकोला पोलीस व्हॉट्सअॅप चॅटबॉटमधील महत्वाचे वैशिष्टयेः-

१ जिल्हयातील प्रत्येक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संपर्क क्रमांक, ईमेल आयडी, सोशल मिडीया

अकाउंट, लोकेशन इत्यादी माहिती उपलब्ध.

२ ई-चालान विषयी माहिती.

३ पारपत्र (Passport) सेवेविषयी माहिती.

४ चारित्र्त्य पडताळणी (Character Certificate) विषयी माहिती.

५ सायबर जनजागृती (Cyber Awareness) संबंधी माहिती.

६ हरवलेले मोबाइल तक्रार नोंदणी प्रक्रिया आणि इतर अनेक उपयुक्त गोष्टीची माहिती या चॅटबॉटच्या माध्यमातुन नागरिकांना मिळणार असुन दिवस रात्र, म्हणजेच २४ तास कार्यरत असेल । त्यामुळे तुम्हाला कधीही आणि कोठेही माहितीची गरज भासल्यास, तो तुमच्या मदतीसाठी तत्पर असेल.

सदर चॅटबॉट श्री. भुषण अरूण रंभापुरे (Cyber Volunteer), सपोनि कान्होपात्रा बन्सा (प्रभारी अधिकारी सायबर सेल), पो.अंम. स्वप्निल ग. दामोदर सायबर सेल यांनी तयार केले आहे. तसेच याबाबत नागरीकांना काही सुचना किंवा माहिती दयायची असल्यास cybercell.akola@mahapolice.gov.in या मेलवर किंवा सोशल मिडीयावर कळवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published.