मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी अकोला पोलीस दल सज्ज!

सध्या पूर्ण महाराष्ट्र राज्या मध्ये विधानसभा निवडणुक २०२४ ची प्रकीया चालु आहे. निवडणुक प्रक्रिया दरम्यान १५.१०.२०२४ पासुन आचारसंहिता लागु करण्यात आली आहे. संपुर्ण महाराष्ट्रात निवडणुक प्रकीया सुरू असुन दिनांक २०.११.२०२४ रोजी मतदान होणार आहेत. निवडणूक अनुषंगाने जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया भयमुक्त वातावरणामध्ये पार पाडण्याकरिता श्री. बच्चन सिंह पोलीस अधीक्षक, अकोला यांचे मार्गदर्शना खाली अकोला पोलीस दल सज्ज झाले असून प्रत्येक विधानसभा मतदार संघ अकोला पूर्व, अकोला पश्चिम, अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर, विभागा नुसार नुसार बंदोबस्त तैनात केला असून बूथ बंदोबस्त, मतदान केंद्र बंदोबस्त, मतदान केंद्रा बाहेर १०० मीटर बंदोबस्त, वाहन पेट्रोलिंग, अशी विभागणी केली आहे, संवेदनशील भागात जास्त बंदोबस्त पोलीस स्टेशन स्तरावर लावण्यात आला आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी अकोला जिल्हयात १२० पोलीस अधिकारी, २३०० पोलीस अंमलदार, १४०० होमगार्ड सैनिक तसेच बाहेरील अर्थ सैनिकबल बी.एस. एफ, सी. आर.पी.एफ, आय.टी.बी.पी. व पंजाब पोलीस, च्या ८ कंपनी, तसेच एस.आर.पी.एफ. नागपूर चे ५ प्लॉटुन असे बंदोबस्त करीता तैनात करण्यात आलेले आहेत.

दिनांक १५.१०.२०२४ रोजी आचारसंहिता लागल्यापासुन २.५ कोटी रूपयाचा मु‌द्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्यामध्ये ५९.५५ लाख कॅश, ३० हजार लिटर दारू, १.५ कोटी ईफीड्रीन चा सामावेश आहे. सन २०१४ मध्ये १४९९६ लीटर दारू किंमत ०९ लाख रू चा मुददेमाल, सन २०१९ मध्ये ११३०६ लीटर दारू किं ११ लाख रू

चा मुददेमाल, तसेच २०२४ मध्ये ३०००० लीटर दारू ३५.४ लाख रू मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. प्रतिबंधक कार्यवाही मध्ये ४ एम.पि.डी.ए. कायदयान्वये तसेच १४०० लोकांवर प्रतिबंधक कार्यवाही करण्यात

आली असुन ५ अग्नीशस्त्र व ४ काडतुस तसेच ७० हत्यार (तलवार/चाकु) जप्त करून कायदेशिर कार्यावाही करण्यात आलेली आहे. अटक वारंटची ६७० लोकांना बजावणी केली आहे. तसेच अर्थ सैनिक बलाच्या तुकडीच्या माध्यमातुन जिल्हयात १०० पेक्षा जास्त रूटमार्च काढण्यात आले आहे. निवडणुकीच्या काळात ७०२ पैकी ६०५ लोकांकडील परवाना धारक शस्त्र जमा करण्यात आले असुन इतर लोकांना संबंधीत कार्यालयाकडुन परवानगी देण्यात आली आहे.

निवडणुकीच्या काळात मा. प्रधानमंत्री बंदोबस्त तसेच ईतर सुरक्षा श्रेणी मध्ये असलेले मान्यवर यांचे प्रचार सभा बंदोबस्त शांततेत पार पाडलेला आहे. आज दिनांक १८.११.२०२४ रोजी चे १७.०० वा. पासुन प्रचार बंद होणार असुन मतदान दिनांक २०.११.२०२४ रोजी सकाळी ०७.००ते सांयकाळी ०६.०० वा. पर्यत्न असणार आहे. क निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याकरिता अकोला पोलीस सज्ज असुन कोणीही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नये. अकोला पोलीसांची सोशल मिडीयावर ई पेट्रोलींग सुरू करण्यात आली असुन पोलीसांची करडी नजर असणार आहे. सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट लिखान करू नये कोणतेही पोस्ट टाकतांना जातीय तेढ निर्माण होणार नाही याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी. भयमुक्त वातावरणा मध्ये निवडणूक प्रक्रिया पार पाडण्या करीता अकोला पोलीस दल सज्ज आहे. कोणताही अनुचित प्रकार आढळून आल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनशी संपर्क करावा तसेच पोलीस हेल्पलाईन नं ११२ वर संपर्क साधावा. असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.