महिला व बालक सुरक्षा व सुरक्षात्मक उपाययोजना
अकोला :
स्थानिक महिला व बालक यांच्या सुरक्षा संबंधाने जनजागृती पर सप्ताह चे आयोजन मा. श्री. संदीप घुगे पोलीस अधीक्षक अकोला यांच्या संकल्पनेतून, श्री. अभय डोंगरे अपर पोलीस अधीक्षक अकोला यांच्या मार्गदर्शना खाली महालक्ष्मी मंगल कार्यालय, कोकणवाडी, मुर्तिजापुर येथे दिनांक ५ डिसेंबर रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळा मध्ये महिला व बालक जनजागृती पर व्हिडिओ दाखविण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटक म्हणुन मा. मो. कुरेशी सा. जेएमएफसी कोर्ट मुर्तिजापुर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे साहेब लाभले. सदर कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणुन मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे साहेब, पोलीस निरीक्षक श्री. भाउराव घुगे ठाणेदार, पोलीस स्टेशन, मुर्तिजापुर शहर श्रीमती उज्वला देवकर, पोलीस निरीक्षक, भरोसा सेल अकोला, श्री. गोपाल मुकुंदे पोलीस हवालदार, स्थानिक गुन्हे शाखा यांनी मुलांना कायदयाचे बारकावे समजावुन सांगत कायदेविषयक मार्गदर्शन केले, महिला व बालक यांनी आपली सुरक्षा कशी करावी या विषयावर विशेष सुचना दिल्या. महिला व बालकांना कायदयाबाबत प्राथमिक ज्ञान देण्यात आले. समाजामध्ये घडणा-या वाईट घटना द त्या घटना कशा टाळता येतील त्याबाबत विशेष मार्गदर्शन केले. मा. संदीपकुमार अपार साहेब उप विभागीय अधिकारी मुर्तिजापुर, मा. सुप्रिया टवलारे मॅडम मुख्याधिकारी नगर परीषद मुर्तिजापुर, यांची प्रमुख उपस्थिती लाभली असुन उपस्थितींनी कार्यशाळेमध्ये मोलाचे मार्गदर्शन केले. बालविवाह, लैंगिक अत्याचार प्रतिबंध कसा करता येईल यावर योग्य मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाकरीता मुर्तिजापुर शहर, मुर्तिजापुर विभागातील सर्व ग्रामीण भागातील शाळा, महाविदयालये तसेच येथील, अंगणवाडी सेविका, शांतता कमिटी सदस्य, महिला बचत गट, पोलीस पाटील व पालक वर्गाचे विशेष सहकार्य लाभले.
यापूर्वी बाळापुर, सिव्हील लाईन, बार्शिटाकळी, पातुर, अकोट येथे महिला व बालक संबंधाने जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर जनजागृतीपर कार्यक्रमाला जनतेकडुन उस्फुर्तपणे प्रतिसाद मिळाला. आजच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन. श्री. गोपाल मुकुंदे पोलीस हवालदार, स्थानिक गुन्हे शाखा यांनी व आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक गणेश सुर्यवंशी साहेब, पोलीस स्टेशन, मुर्तिजापुर यांनी केले, व कार्यक्रमाचे यशस्वीतेचे करीता पोलीस निरीक्षक श्री. भाउराव घुगे ठाणेदार, पोलीस स्टेशन, मुर्तिजापुर शहर, सपोनि. श्री. सुकोशे ठाणेदार, पोलीस स्टेशन, माना, सपोनि. श्री. सुरेंद्र राउत, ठाणेदार मुर्तिजापुर ग्रामीण, पोउपनि. गणेश सुर्यवंशी पोस्टे मुर्तिजपुर शहर पोउपनि मनोहर वानखडे मुर्तिजापुर शहर, तसेच पोलीस अधिकारी व पो. अंमलदार पोलीस स्टेशन मुर्तिजापुर शहर, मुर्तिजपुर ग्रामीण व माना यांनी विशेष परिश्रम घेतले.