
अकोला शहर हे शैक्षणिकदृष्टया अत्यंत महत्वाचे शहर असुन अकोला, तसेच इतर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्याकरीता दरवर्षी हजारोच्या संख्येने अकोला शहरात दाखल होतात. ते विदयार्थी या ठिकाणी खाजगी निवासस्थान किंवा वसतीगृहात राहुन आपले शिक्षण पूर्ण करतात. त्या अनुषंगाने दिनांक ०३.०२.२०२४ रोजी ११.०० वाजता विजय हॉल, पोलीस अधीक्षक कार्यालय, अकोला येथे शहरातील तसेच जिल्हयातील शाळा मुख्याध्यापक यांचे सोबत विदयार्थी सुरक्षा या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्रामध्ये पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह यांनी मुख्याध्यापका सोबत चर्चा केली. त्याअनुषंगाने सर्व ठाणे प्रभारी व दामिणी पथक तसेच वाहतूक शाखा यांची तातडीची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्स व्दारे घेऊन तातडीने उपाय योजना करण्याबाबत निर्देश दिले होते.
त्या अनूषांगाने दिनांक ५.०२.२०२४ ते १०.०२.२०२४ दरम्यान अकोला जिल्ह्यात पोलीस स्टेशन प्रभारी शहर विभाग यांनी ७२, मुर्तिजापुर विभाग यांनी ६२, अकोट विभाग यांनी ४०, बाळापुर विभाग यांनी ३२ दामिनी पथक यांनी १० अशा एकुण २१६ भेटी देऊन विदयार्थी सोबत संवाद साधला आहे तसेच दामिनी पथक यांना वेळा पत्रकानुसार प्रत्येक शाळा विद्यालय यांच्या संपर्कात आहेत दामिणी पथका कडुन व्हाटसअॅप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. तसेच कोणतीही तक्रार करण्याकरिता विशेष मोबाईल क्रमांक ७४४७४१००१५ वर संपर्क करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. तसेच तकादाराचे नावाची गुप्तता ठेवण्यात येईल तसेच अकोला पोलीसांचे Instagram-Police_akola,Twitter- @AkolaPolice, Fecebook-Akola DistricPolice, You Tube @akolapolice 8113 या सोशल साईडला Follw करावे पोलीस मदत क्रमांक ची माहिती होण्यासाठी माहिती पत्रक लवकरच वाटण्यात येणार आहेत, त्यामध्ये महत्वाचे संपर्क नंबर असणार आहेत, तसेच प्रत्येक पोलीस स्टेशन च्या हद्दीत दामिणी पथक सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु असून लवकरच त्याची स्थापना करण्यात येईल. भविष्यात सुद्धा असे विविध उपक्रमाच्या माध्यमातून भयमुक्त विध्यार्थी कसा होईल यावर भर देऊन योग्य ती पाऊले उचलण्यात येणार असल्या बाबत कळविले आहे. काही अनुचित प्रकार आढळून आल्यास निसंकोचपणे पोलीसांशी ११२ या मदत क्रमांक वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.