अकोला जिल्ह्यामध्ये महिला व विध्यार्थी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विविध योजना अकोला पोलीस दल राबवित आहे. अकोला शहरामध्ये महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एकच दामिनी पथक कार्यरत होते. मा. पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह यांच्या संकल्पनेतुन आता संपूर्ण जिल्हा भर दामिनी पथक कार्यरत करण्यासाठी विशेष पाठपुरावा करण्यात आला. जिल्हा प्रशासनाने ३४ वाहने उपलब्ध करून दिली. त्या वाहनांचा लोकार्पण सोहळा पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांच्या हस्ते आज दिनांक ०७.०३.२०२४ रोजी दुपारी ०५.०० वा ‘राणी महल, पोलीस लॉन, अकोला येथे आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाला मा. श्री अजित कुंभार, जिल्हाधीकारी अकोला, मा. श्रीमती बी. वैष्णवी, मुख्य कार्यकारी अधीकारी अकोला जिल्हा परिषद अकोला यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमाची सुरवात अकोला पोलीसांची शॉर्ट फिल्म दामिनी ने करण्यात आली. मान्यवरांचे स्वागत व सत्कार तसेच कार्यक्रमाचे प्रास्तावीक पोलीस अधीक्षक यांनी केले. दामिनी पथकाची कार्यपध्दती ही शहर व ग्रामीण भागात महिला व विदयार्थी सुरक्षा करीता हे पथक कार्यरत राहिल असे आपले प्रास्तावीकातुन मत मांडले. त्यांनतर अॅड मनिषा धुत, डॉ. सोनखासकर, अॅड रेवती राठोड, पोनि उज्वला देवकर यांनी आपले विचार मांडले, मान्यवरांच्या हस्ते दामिनी पथकाच्या माहिती पत्रकारचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर दामिनी पथकाचे कामकाज कसे राहिल यावर एक चित्रफीत दाखविण्यात आली, त्यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते ३४ दुचाकी वाहण ‘दामिनी मार्शल’ चे हिरवी झेंडी दाखवुन लोकार्पण करण्यात आले. सदर उपक्रमाला विशेष सहकार्य मा. श्री अजित कुंभार जिल्हाधीकारी यांचे लाभले त्यानी तात्काळ वाहने उपलब्ध करून दिले त्याबददल मा. पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना विधायाक कामासाठी अकोला प्रशासन नेहमी सकारात्मक आहे असे मत मांडले व या
उपक्रमास शुभेच्छा दिल्या. पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांनी आपल्या जिवनातील अनुभव कथन केले. परिस्थती कशीही असली तरी दामिनी बनुन आपले कार्य करावे असे विचार प्रगट केले. पोलीस विभागाच्या या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनिय कामगीरी करणारे महिला कु. सोम्या गुप्ता, मपोका पुजा भटकर, कु. मिनाक्षी मुकुंदे, मपोका प्रिती मोहोड, मपोका रोशनी अस्वार, पोनि प्रविण तायडे मोटार परिवहण विभाग, तसेच पोलीस स्टेशन स्तरावर उल्लेखनिय कामगीरी करणा-या ४७ महिला पोलीस अंमलदार यांना मान्यवरांचे हस्ते सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रर्दशन अपर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ. स्वप्ना लांडे यांनी केले. सदर कार्यक्रमाकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सतीष कुळकर्णी, पोनि. शंकर शेळके स्था. गु.शा, तसेच शहरातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, संपूर्ण जिल्हयातील महिला दक्षता समीती सदस्य, एन.जी.ओ. असे ४०० ते ५०० महिलांची उपस्थिती होती. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.