अकोला पोलीस दलातील २५० पोलीस अंमलदारांचा पदोन्नती सोहळा संपन्न….

Table of Contents

अकोला पोलीस दलातील ५२ पोलीस हवालदार यांना सहा. पोलीस उपनिरीक्षक व १९८ पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार असे एकुण २५० पोलीस अंमलदार यांना सेवाजेष्ठता नुसार प्रजासत्ताक दिनाचे निमीत्ताने पदोन्नती देऊन प्रजासत्ताक दिनाची भेट दिली, पदोन्नतीस पात्र व पदोन्नीच्या प्रतिक्षेत असलेल्या अंमलदाराच्या पदोन्नतीचे आदेश दिल्यानंतर आज दिनांक २७/०१/२०२४ रोजी पदोन्नती झालेल्या पोलीस अंमलदार यांचा सहकुटुंब सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

अशा प्रकारचा पदोन्नतीचा सोहळा एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच होत असल्याने अकोला पोलीस दलात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर कार्यकम पोलीस लॉन अकोला येथे सकाळी ११.०० वाजता आयोजीत करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाची सुरवात पदोन्नती सोहळया पासुन करण्यात आली. पोलीस हवालदार यांच्या खांदयावर सहायक पोलीस उपनिरक्षक पदाचे बोध चिन्ह तसेच पोलीस नाईक आंदयावर पोलीस हवालदार यांचे बोधचिन्ह पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधीकारी शहर विभाग श्री सुभाष दुधगावकर, तसेच पोलीस कुटुंबातील सदस्य यांच्या हस्ते लावण्यात आले. असा हा कार्यक्रम पोलीस विभागात प्रथमच व्यापक स्वरूपात होत असल्याने पोलीस अंमलदार यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण होते. पोलीस कुटुंबीयांनी तसेच पोलीसांनी आपले मनोगत व्यक्त करतांना आनंद व्यक्त केला. जिवनातील अविस्मरणीय क्षण अनुभवतांना सर्व पोलीस अंमलदार व कुटुंबीय आनंदी होते. अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळे एक उर्जा पोलीस अंमलदार यांना मिळाली. पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह यांनी पोलीस बांधवांना पदोन्नती च्या शुभेच्छा दिल्या, सदर कार्यक्रमाला शहर विभागातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी तसेच सर्व शाखांचे प्रभारी अधिकारी यांची उपस्थिती होती,

सदर चा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता राखीव पोलीस निरीक्षक श्री गणेश जुमनाके व पथक यांनी मेहनत घेतली तर कार्यक्रमावे आभार प्रदर्शन प्र. पोलीस उपअधीक्षक श्री विजय नाफडे यानी केले. सुत्र संचालन पोलीस हवालदार श्री. गोपाल मुकुंदे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.