पोलीस अधीक्षक, अकोला श्री. बच्चन सिंह यांनी ०९ पोलीस हवालदार यांना सहा. पोलीस उपनिरीक्षक व १३ पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार असे एकुण २२ पदोन्नतीस पात्र अंमलदाराच्या पदोन्नतीचे आदेश दिल्यानंतर पदोन्नती झालेल्या पोलीस अंमलदार यांचा सहकुटुंब सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक कार्यालय विजय हॉल अकोला येथे दिनांक ०७.०५.२०२४ रोजी ११.०० सदर कार्यक्रमाची सुरवात पदोन्नती सोहळया पासुन करण्यात आली. पोलीस हवालदार रविंद्र कळसकर, सुरज मंगरूळकर, संजय मथने, रमेश बलखंडे, दिलीप हिंगणकर, संजिवकुमार तायडे, श्री गजानन मोरे, श्री संजय वरठे, गजानन ढोरे, यांच्या खांदयावर सहायक पोलीस उपनिरक्षक पदाचे बोध चिन्ह तसेच पोलीस नाईक निशा वाकडे, महेश पाटील, धनश्री वाहुरवाघ, तुषार केणे, कादिर गवळी, विवके सोनटक्के, राहुल जंजाळ, सुनिल येलोने, प्रदिप गावंडे, अविनाश पाचपोर, सै. रफिक, राहुल इंगळे, उमेश इंगळे, यांच्या खांदयावर पोलीस हवालदार पदाचे बोधचिन्ह मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह, व पोलीस कुटुंबातील सदस्य यांच्या हस्ते लावण्यात आले.
अशा प्रकारचा अविस्मरणीय कार्यक्रम असल्याने पोलीस अंमलदार यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण होते. पोलीस कुटुंबीयांनी तसेच पोलीसांनी आपले मनोगत व्यक्त करतांना आनंद व्यक्त केला व अशा उपक्रमाचे आयोजन केल्या बददल पोलीस अधीक्षक यांचे आभार मानले. जीवनातील अविस्मरणीय क्षण अनुभवतांना सर्व पोलीस अंमलदार व कुटुंबीय आनंदी होते अशा प्रकरच्या कार्यक्रमामुळे एक उर्जा पोलीस अंमलदार यांना मिळाली.
कार्यक्रमासाठी पोलीस अंमलदारांचे कुटुंबीयांची विशेष उपस्थिती होती. सदर चा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता राखीव पोलीस निरीक्षक श्री. गणेश जुमनाके, यांनी मेहनत घेतली तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्र. पोलीस उपअधीक्षक (गृह) श्री. विजय नाफडे यांनी केले. सुत्र संचालन पोलीस हवालदार श्री. गोपाल मुकुंदे यांनी केले.