संपूर्ण महाराष्ट्र राज्या मध्ये विधानसभा निवडणुक २०२४ ची प्रक्रीया चालु आहे. निवडणूक प्रक्रिया दरम्यान दिनांक १५.१०.२०२४ पासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणुक प्रक्रीया शांततेत पार पाडण्यासाठी अकोला पोलीस दला तर्फे विविध उपाय योजना सुरू आहेत त्यामध्ये नाकाबंदी, कोबींग, रुटमार्च प्रतिबंधक उपाय योजना करण्यात आल्या आहेत. मा. श्री बच्चन सिंह पोलीस अधीक्षक, अकोला यांच्या मार्गदर्शना खाली, पोलीस स्टेशन स्तरावर विविध विशेष मोहिम राबविण्यात येत आहेत.गुन्हेगारी वृत्तीवर वचक बसावा, या करीता निवडणुक अनुषंगाने प्रतिबंधक कार्यवाहिवर विशेष भर देण्यात आला असून गुन्हे बाबत रेकार्ड असणा-या गुन्हेगारांवर प्रतिबंधक कार्यवाही करीता विशेष मोहीम पोलीस स्टेशन स्तरावर राबविण्यात येत आहे. त्यानुसार निवडणुक आचार संहिता कार्यकाळात आजपावेतो एकुण १४६२ गुन्हेगावर प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम ५६ नुसार ०२ ईसमांवर तडीपार करण्याची व एम.पी.डी.ए. अॅक्टनुसार ०४ सराईत गुन्हेगारांवर स्थानबध्दतेची कार्यवाही करण्यात आलेली आहे. तसेच MCOCA कायदयाखाली २६ आरोपी व MPDA कायदयान्वये केलेल्या कार्यवाहीतील ५६ आरोपींना चेक करण्यात आले आहे, अशी प्रतिबंधक कार्यवाही मोहीम यापुढे ही सुरू राहणार आहे.तरी कोणी विधानसभा आचारसंहीतेच्या काळात कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा अथवा शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास त्या इसमाविरूब्द कठोर प्रतिबंधक कार्यवाही करण्यात येईल तसेच काही संशयास्पद प्रकार आढळून आल्यास त्याबाबत तात्काळ पोलीसांना माहिती दयावी, निवडणुक प्रक्रीया शांततेत पार पाडण्यासाठी अकोला पोलीर सज्ज असुन आपण सुदया सर्तक रहावे असे आवाहन प्रसिदधी पत्रकाव्दारे करण्यात येत आहे.