अकोला : नव्या उड्डाणपुलावर राँग साईडला आता “स्पाईक”चा धाक; नियम मोडला तर टायर पंचर!

अकोला, प्रतिनिधी (प्रशिक मेश्राम);– शहरातील नव्याने सुरू झालेल्या उड्डाणपुलावर राँग साईडने धावणाऱ्या वाहनांमुळे वाढणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिस दलाने कडक उपाययोजना राबवली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून रस्ता सुरक्षा समितीकडे मांडलेल्या प्रस्तावास जिल्हाधिकारी तथा समिती अध्यक्षा यांची मंजुरी मिळाल्यानंतर आज (दि. १२ फेब्रुवारी २०२६) पासून दोन ठिकाणी स्पाईक बॅरियर बसविण्यात आले आहेत.हे स्पाईक बॅरियर१) उड्डाणपुलावरून नेहरू पार्क चौकाकडे उतरणाऱ्या मार्गावर२) उड्डाणपुलावरून टॉवर चौकाकडे उतरणाऱ्या मार्गावरबसविण्यात आले असून, विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांचे टायर आपोआप पंक्चर होतील अशी यंत्रणा आहे.

याशिवाय ठिकठिकाणी “राँग साईडने वाहन नेऊ नये” असे सूचनाफलकही लावण्यात आले आहेत.पोलीस प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, नियम मोडून राँग साईडने वाहन नेल्यास टायरचे नुकसान झाले तर त्यास वाहनचालक स्वतः जबाबदार राहतील. तसेच शहर वाहतूक शाखेकडून दोन्ही ठिकाणी नियमित पोलीस कर्मचारी तैनात करून मोटार वाहन कायद्यानुसार कारवाईही केली जाणार आहे.स्थानिक भाषेत सांगायचं तर — “उलटं चाललात तर टायर बसणारच!” त्यामुळे अकोलेकर वाहनचालकांनी शहाणपणाचा मार्ग धरत वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.