
अकोला |
पोलीस अधीक्षक मा. श्री. अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्ह्यात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या “ऑपरेशन प्रहार” मोहिमेंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे.
दिनांक 14 जुलै 2025 रोजी एलसीबी अकोला पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जैन चौक अकोला येथे पत्त्याच्या सहाय्याने सुरू असलेल्या हार-जीतीच्या जुगारावर छापा टाकण्यात आला. सदर छाप्यात तब्बल 13 जणांना रंगेहाथ पकडण्यात आले, तर त्यांच्याकडून नगदी 55,000 रुपये, 11 मोबाईल फोन (मूल्य 1,01,000 रु.) आणि 5 मोटारसायकल (मूल्य 2,50,000 रु.) असा एकूण 4,06,000 रुपयांचा मुद्देमाल पंचा समक्ष जप्त करण्यात आला.
अटकेत घेतलेले आरोपी –नितीन अशोक गोहरअनिल गोवर्धनदास चांडक महेंद्रसिंग त्रिपालसिंग दिवाकरमोहसीन खान सलीम खानमजर खान जाफर खानशेख राहील शेख आजारमोहम्मद आतिक मोहम्मद हबीबसचिन हेमंत सावळेबशीर खान रहू खान शेख रफिक शेख हुसेनभारत हिम्मत जाधवउमेश जुंबन दामले स्वराज दिलीपसिंग ठाकूर
वरील आरोपींविरुद्ध जुने शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम 4, 5 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कारवाईचे नेतृत्व –
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, मा. अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी व पोलीस निरीक्षक श्री. शंकर शेळके यांच्या सूक्ष्म मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी –
API गोपाल ढोले, HC उमेश पराये, HC खुशाल नेमाडे, PC आकाश मानकर, PC अभिषेक पाठक, मो. आमिर, चालक GPSI ठाकरे आणि PC खरात (स्थानीय गुन्हे शाखा, अकोला) यांनी ही धडक कारवाई केली.
“ऑपरेशन प्रहार” अंतर्गत अशा अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांची कडक नजर असून, यापुढील काळातही अशा कारवाया सातत्याने सुरू राहतील, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.