अकोला अति संवेदनशिल भागात RAF शिघ्र कृती दलाचा रूट मार्च.

अकोला शहर अती संवेदनशिल म्हणुन ओळख आहे शहरातील नागरिकांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण व्हावी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा, आगामी सन उत्सव व सार्वत्रिक निवडणुका शांततेत व निर्भिड वातावरणात पार पाडावा तसेच RAF (शिघ्र कृती दल) B कंपनी १०७ बटालीयन यांना शहरातील संवेदनशिल व अतिसंवेदनशिल परिसराची माहिती व्हावी याकरीता दि.०८.०२.२०२४ रोजी सायंकाळी १६.०० ते १८.३० वा पावेतो मा. पोलीस अधीक्षक सा. अकोला यांचे मार्गदर्शनात पो.स्टे. अकोट फाईल व सिव्हील लाईन हददीत RAF (शिघ्र कृती दल) यांचा खालील मार्गाने रुटमार्च काढण्यात आला होता.सदर रूटमार्च मा. श्री. अभय डोंगरे अपर पोलीस अधीक्षक सा. अकोला, श्री. सतिश कुलकर्णी उप विभागीय पोलीस अधिकारी श. वि. अकोला, श्री. अमनकुमार सहा. कमांडन्ट RAF तसेच शहरातील सर्व पोलीस स्टेशन मधील ठाणे प्रभारी अधिकारी यांचेसह RCP प्लाटुन & QRT तसेच पो.स्टे. मधील अंमलदार असे एकुण २८ अधिकारी + २५० कर्मचारी सहभागी झाले होते.पो.स्टे. अकोट फाईल रुटमार्च मार्ग : दक्षिण मध्य रेल्वे परिसर, आपातापा चौक, पोस्टे समोरून भोलाचौक, जगजिवनराम चौक, भिम चौक, रामदासमठ, साबरिया चौक, अब्दुल कलाम चौक, अकोट रोड मार्गे आपातापाचौक पर्यंत.पो.स्टे. सिव्हील लाईन रुटमार्च मार्ग:- कंवरनगर गॅस गोडावुन, गोकुळ कॉलनी, ट्युशन क्लासेस परिसरजवाहरनगर, राजे संभाजी पार्क, प्रभात किड्स ते शासकिय दुधडेअरी मागील भागात फिरून समाप्त.सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की, त्यांना केव्हाही पोलीसांची मदत लागल्यास डायल ११२ वर कॉल केल्यास त्यांना तात्काळ मदत पोहचविण्यात येते. मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह यांनी अकोला शहर व जिल्हयात Visible Policing आणि Crime Prevention अनुषंगाने शहरात सकाळी ०६.०० ते ०९.०० या वेळेत गुड मॉर्निंग पेट्रोलिंग, फिक्स पॉईन्ट आणि सायंकाळी १८.०० ते २३.०० यावेळेत, जिल्हयातील सर्व पो.स्टे. परिसरामध्ये १६ मोटर सायकलव्दारे या विशेष पेट्रोलिंग ठेवण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.