अकोला ग्रंथोत्सव कवी संमेलन व गीत गायनाने बहरला !

अकोला : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने ग्रंथोत्सवाचा दुसरा दिवस कवी संमेलन व गीत गायनाने बहरला अकोट येथील कुमारी आचल सदार या मुलींनी गीत गायन कार्यक्रमात त एकापेक्षा एक मराठी गीतांनी ग्रंथोत्सवाला प्रारंभ करून रसिकांना मंत्रमुग्ध केले त्यानंतर परिसंवाद घेण्यात आला आपल्या पाल्यांना वाचनाची आवड लागावी म्हणून पालकांची भूमिका यावर परिसंवाद रंगला कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी अनुराग मिश्र होते या परिसंवादात डॉ. गजाननराव वाकोडे व अभियंता अनंतराव गावंडे यांनी मंथन केले

पालकांनी मोबाईल जवळ न करता पुस्तके जवळ केली तर वाचनाची पिढी तयार होईल अन्यथा भावी पिढीस डिजिटल अरेस्ट शी सामना करावा लागेल करिता ज्ञानाच्या कक्षा उंचावणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले तिसऱ्या सत्रात स्मृतींच्या मशाली अनामिक स्वातंत्र्यसंग्राम सेनानी चे क्रांती दर्शन दिलीप देशपांडे यांनी सादर केले दुपारच्या सत्रात हास्य कवी संमेलन घेण्यात आले. कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी हास्य सम्राट संजय कावरे होते यात अमोल शिरसाट अमोल गोडंचवर प्रशांत भोंडे एजाज शेख रामेश्वर पोहेकर यांनी एकापेक्षा एक काव्यरचना सादर केली सूत्रसंचालन गोपाल मापारी यांनी केले ग्रंथोत्सवाचा समारोप दोन दिवशीय चालणाऱ्या ग्रंथोत्सवाचा समारोप डॉक्टर गजानन नारे यांच्या उपस्थित घेण्यात आला याप्रसंगी व्यासपीठावर सहाय्य ग्रंथालय संचालक राजेश पाटील अमरावती विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रभाकर घुगे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष शामराव वाहूवाघ ग्रंथालय निरीक्षक राजेश कोलते राम मुळे यांची उपस्थिती होती यशस्वी केल्याबद्दल कैलास गव्हाळे रवींद्र नीखार यांच्या सत्कार करण्यात आला संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन ग्रंथ मित्र राजेश डागंटे यांनी व आभार कैलास गव्हाळे यांनी मानले ग्रंथोत्सवाला जिल्ह्याची ग्रंथालय पदाधिकारी वाचक यांची उपस्थिती लक्षणीय होती

Leave a Reply

Your email address will not be published.