अकोला जिल्ह्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त — कोम्बिंग ऑपरेशन आणि नाकाबंदी दरम्यान गुन्हेगारांना चोख इशारा!

७ हत्यार जप्त • ५ तडीपारांवर कारवाई • ७४० वाहनांची तपासणी • ५५ हजारांचा दंड

अकोला(प्रतिनिधी):-
गुन्हेगारीला रोखण्यासाठी अकोला पोलीसांनी पुन्हा एकदा कठोर पावले उचलली आहेत. मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १६ जुलै २०२५ च्या रात्री १० वाजल्यापासून ते १७ जुलैच्या पहाटे ५ वाजेपर्यंत जिल्हाभरात कोम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदीचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले.

या ऑपरेशनमध्ये जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेप्रमुख व एकूण ३९ अधिकारी आणि २१३ अंमलदारांचा समावेश होता. पोलिस अधीक्षकांनी स्वतः नाकाबंदी पॉईंटवर भेटी देत कार्यवाहीची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या.

ऑपरेशन दरम्यान ३० नाकाबंदी ठिकाणी ७४० वाहनांची कसून तपासणी करून मोटार वाहन कायद्यानुसार १४७ कारवाया केल्या गेल्या आणि तब्बल ₹५५,१००/- दंड आकारण्यात आला.
तसेच:

१२९ समन्स,

५२ जमानती वॉरंट,

१६ पकड वॉरंट तामील

७९ निगराणी बदमाशांची तपासणी

ह्यातून गुन्हेगारांवर वचक बसला आहे.

कायदेशीर कारवाया:

मपोका कलम १२२ अंतर्गत – १८ प्रकरणे

मपोका कलम १४२ अंतर्गत – ५ प्रकरणे

भारतीय हत्यार कायदा – ७ प्रकरणे

महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३३ – ७ प्रकरणे

महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११०, ११७ – ७० प्रकरणे

याशिवाय, ८० हॉटेल व लॉजेस, ७२ एटीएम सेंटर यांची तपासणी करण्यात आली.
दारूबंदी कायदा अंतर्गत ४ प्रकरणे तर जुगारविरोधी कायदा अंतर्गत १ प्रकरण नोंदवण्यात आले.

मा. पोलीस अधीक्षक श्री. चांडक यांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी अशा मोहिमा वेळोवेळी राबविल्या जातील, असे स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.