अकोला जिल्हा पोलीस दल गणेश विसर्जन मिरवणूकी बंदोबस्त करीता सज्ज

अकोला जिल्हयात सर्वत्र श्री गणेश उत्सवास सुरवात झालेली

असून स्थापना दिवसापासुनच अकोला जिल्हा पोलीस प्रशासन सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. अकोला जिल्हयात एकून १७४१ गणेश स्थापना झाली असून सुमारे २९२ गावात एक गांव एक गणपती स्थापन करण्यात आले आहे. पोलीस दलातर्फे गणेश मंडळ ठिकाणी नियीमत भेट व चेकींगसाठी ६७३ क्यु आर कोड लावण्यात आले असून त्याव्दारे पोलीस गणेश मंडळांना भेटी देवुन उत्कृष्ठ समन्वय ठेवून आहेत. जिल्हयात दिनांक १७ व १८ सप्टेंबर रोजी मुख्य विर्सजन असून जिल्हयात एकूण ६७ ठिकाणी शहर व ग्रामीण भागात सार्वत्रिक मिरवणूक काढण्यात येणार आहेत. या करीता पोलीस प्रशासनाने जयत तयारी केली असून वरिष्ठ अधिकारी महत्वाचे शहरांना भेटी देवून विसर्जन तयारी बाबत आढावा घेत आहे, ज्यामध्ये दंगाकाबू योजना तालीम, पोलीस स्टेशनला उपलब्ध दारुगोळा, हत्यारे यांची सज्जता तपासणी करण्यात येत आहे.

पोलीस अधिक्षक व अपर पोलीस अधिक्षक हे जिल्हयात स्वतः महत्वाचे ठिकाणी भेट देत आहेत व रुट मार्च मध्ये सहभागी होवून जिल्हा पोलीस दलाचे मनोबल उंचावत आहेत. आज जिल्हा पोलीस दलातर्फे अकोला शहरात रुटमार्च काढण्यात आला त्यामध्ये पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधिक्षक हे स्वतः सहभागी झाले होते. पोलीस विभागातर्फे गणेशोत्सव चे पार्श्वभुमीवर एकूण ३९ शांतता समितीच्या बैठका घेण्यात आल्या असून सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व प्रभारी अधिकारी व त्याचे कनिष्ठ अधिकारी, अंमलदार हे महत्वाचे गांवाना भेटी देवून जनसंपर्क वाढवत आहेत, आजपावेतो सुमारे ४१५ ग्रामभेटी देण्यात आल्या आहेत, जिल्हयात एकूण ९३ गावांना रुटमार्च चे आयोजन करुन पोलीसांनी पथसंचालन करुन मनुष्यबळ व शस्त्रप्रदर्शन केले आहे.

गणेशोत्सव शांततेत पार पडत असला तरी काही विध्नसंतोषी व समाजकंटक हे विसर्जन मिरवणूकीमध्ये बाधा आणू नये हेतुने सुमारे ३५२९ पोलीस रेकॉर्ड असणारे इसमांवर विविध कलमांखाली प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आलेली असून त्यांचेकडून चांगले वर्तणूकीचा बॉड घेण्यात आलेला आहे. तसेच ज्यांच्याकडून विसर्जन काळात शांतता भंग होवू शकेल असे सुमारे ११० इसम यांची ओळख पटवून त्यांना विसर्जन काळात हददीबाहेर राहणेबाबत कलम १४४ प्रमाणे कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडून नोटीस बजावणी करण्यात आलेल्या आहेत.

गणेश विसर्जन व ईद हे सण सोबत कालावधीत साजरे होत असून दोन्ही उत्सव मिरवणूका दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे हेतू अकोला पोलीस दलातर्फे मोठया संख्येत मनुष्यबळ रस्त्यावर उतरणार असून त्यामध्ये ५ पोलीस उप अधिक्षक, १२७ पोलीस अधिकारी , सुमारे २३०० अंमलदार तसेच बाहेरीत एसआरपीएफ चे १ कंपनी व १ प्लाटून तसेच ८०० होमगार्डस असा बंदोबस्त तैनात असणार आहेत. जलद प्रतिसाद देण्यासाठी आर.सी.पी.चे ४ पथके

तयार करण्यात आले असून ९ स्ट्रायकिंग फोर्स जिल्हयात विविध ठिकाणी तैनात राहणार आहेत.

दोन्ही उत्सवाचे मिरवणूक जवळपास सोबतच आले असल्याने नागरिकांनी गणेश विसर्जन व ईद मिरवणूक उत्साहात परंतु नियमांचे पालन करुन व इतर धर्मीयांचे भावनांचा आदर करुन साजरा करावा, व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन अकोला जिल्हा पोलीस दलाचे वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.