
संदीप घुगे येणार नवे एस पी अकोला
अकोला जिल्ह्यात कार्यरत जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या समवेत आय पी एस अधिकाऱ्यांच्या बदली चे आदेश आज संध्याकाळी उशिरा शासनाने निर्गमित केले आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या जागेवर आता नवे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून राज्य राखीव बल गट क्र 11 नवी मुंबई चे संमादेशक संदीप घुगे हे येत आहेत.
पोलीस प्रशासनाने 22 एन मधील तरतुदी नुसार आज पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून तसे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत यामध्ये जी श्रीधर सहित अन्य काही पोलीस अधिकारी यांचे बदली चे स्थान निश्चित करण्यात आले नाही मात्र त्यांच्यासाठी स्वतंत्र आदेश काढण्यात येतील असे ही आजच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.