अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे स्वातंत्र्याची अमृत महोत्सवी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले…

       आज  दिनांक १६/०८/२०२३ रोजी अकोला जिल्हा पोलीस दला तर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मेरी माटी मेरा देश या उपक्रमाअंतर्गत वाहतुकीच्या नियमांची जनजागृती करिता स्वातंत्र्याची अमृत महोत्सवी सायकल  रॅलीचे चे आयोजन करण्यात आले होते मा.अजित कुंभार जिल्हाधिकारी अकोला यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये  मा.श्री. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली,पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला येथून सकाळी सात वाजता रॅलीला मा.श्री.अजित कुंभार जिल्हाधिकारी अकोला यांनी हिरवी झेंडी दाखवुन  सुरुवात केली. सायकल रॅली पोलीस अधीक्षक कार्यालय, लक्झरी बस स्टँड, सरकारी बगीचा, सिटी कोतवाली, तिलक रोड, अकोट स्टँड, रेल्वे स्टेशन, अग्रसेन चौक, दुर्गा चौक, रतनलाल प्लॉट चौक, सिव्हिल लाईन, चौक नेहरू पार्क, रामलता बिझनेस सेंटर  , इन्कम टॅक्स चौक, तुकाराम चौक, तुकाराम चौक मार्गे पुन्हा नेहरू पार्क, हुतात्मा चौक, मार्गस्त होऊन, वाहतूक नियम या विषयावर जनजागृती पर पोस्टर लावून तसेच ऑडिओ सिस्टम द्वारे  वाहतुकीचे नियमा बाबत माहिती देण्यात आली  तसेच  वाहतुकीचे नियम याबद्दल पोस्टर लावण्यात आले होते. रॅली समारोप पोलीस अधीक्षक कार्यालय येथे झाला,मा.श्री.अजित कुंभार जिल्हाधिकारी अकोला यांनी शुभेच्छा दिल्या व लवकरच फिट अकोला हा उपक्रम जिल्हा पातळीवर सुरु करण्यात येईल असे आपले मत व्यक्त केले, मा.श्री संदिप  घुगे पोलीस अधीक्षक यांनी रॅली मध्ये सहभागी सर्वांचे आभार मानले.
         
 सदर  कार्यक्रमाला  डॉ. श्री. कुमारस्वामी एस.आर.उपवन संरक्षक अकोला, मा.श्री.अभय डोंगरे अपर पोलीस अधीक्षकअकोला,मा.श्री.संजय नाफडे प्रभारी पोलीस उपअधीक्षक [गृह]अकोला,मा.श्री.शंकर शेळके पो.नी.. स्थानिक गुन्हे शाखा अकोला,मा.श्री. सुनील किनगे पोनी शहर वाहतूक शाखा अकोला तसेच आय एम ए अकोला यांची टीम तसेच शहर विभागातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.