
५० हजार रुपये नुकसान भरपाई द्या! समाज क्रांती आघाडीचे तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानामुळे ओला दुष्काळासह हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी यासाठी समाज क्रांती आघाडीच्या वतीने अकोला जिल्हाध्यक्ष दिगंबर पिंप्राळे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाद्वारे तहसिलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
अकोला जिल्ह्यातील शेतकरी दिवसेंदिवस नाडल्या जात आहे.प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांच्या हातचे पीक उद्ध्वस्त झाले असून त्यांना आता पुढल्या पिकाची चिंता निर्माण झाली आहे.उडीद, सोयाबीन,कापूस, ज्वारी यासह विविध पिकांचे नुकसान झाले असून तात्काळ सरकारने अकोला जिल्हा ओला दुष्काळ म्हणून जाहिर करावा व हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी.शेतकऱ्यांना पुढील पिकासाठी कर्ज लवकरात लवकर मिळावे यासाठी बॅंकांना निर्देश द्यावेत.जेणेकरुन पीक उभे करण्यास सोईचे होईल.महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या हा चिंतेचा विषय निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्येला आळा कसा घालता येईल या दृष्टीने सरकारने योग्य ते पाऊल उचलणे गरजेचे आहे.हे सर्व पाहता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानामुळे ओला दुष्काळासह हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्या.अन्यथा संपूर्ण जिल्हाभर समाज क्रांती आघाडीच्या वतीने जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला.यावेळी समाज क्रांती आघाडीचे अकोला जिल्हाध्यक्ष दिगंबर पिंप्राळे,पंजाबराव काळे,रहिमभाई कुरेशी,गणेश चौरागडे, रामेश्वर कावरे,रशीद खाँ अजीज खाँ,साबिर मिर्झा,उषा नारे,मंगला पाखरे,शेख जाफर, रामदास गव्हाळे,मधुकर कंटाळे,शकीलाबी अ.नासिर,प्रल्हाद वानखडे,अवधुत सिरसाट,शे.जाबीर शे.हुसेन, रामदास तायडे,हमीद हुसेन,शेख फारुख,माणिक इंगळे, रामभरोसे रावते,शेख रहेमान,बबन हरसुले,लक्ष्मी तायडे आदी उपस्थित होते.