
अकोला: मराठा आरक्षण मिळण्यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात दि. 29 ऑगस्ट 2023 पासुन श्री मनोज जरांगे व इतर 10 आंदोलनकर्ते उपोषणास बसले होते. सदरील उपोषणास राज्यातुन मोठा प्रतिसाद मिळत होता. परंतु शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलन कर्त्यांवर सरकारच्या इशा-यावर पोलिसांनी दि. 01 सप्टेंबर रोजी अमानुषपणे लाठीचार्ज केला. इतिहासात मराठा समाजाचे आजवर झालेले सर्व आंदोलने हे शांततेच्या मार्गाने झालेले होते. त्यामुळे अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी मराठा आरक्षण विरोधी सरकारचा जाहिर निषेध करते. अशी प्रतिक्रिया मनपा माजी विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांनी दिली.
प्रशांत पाटील वानखडे अध्यक्ष महानगर काँगेस कमिटी,अशोक अमानकर अध्यक्ष अकोला जिल्हा काँग्रेस किमिटि, बनराव चौधरी मा. आमदार, साजिद खान पठाण, मा. विरोधी पक्षनेता, डॉ. सुधीर ढोणे, प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश कमिटी, मोहम्मद इरफान मा. नगरसेवक, रवि शिंदे, रवींद्र तायडे, आकाश कवडे, अनुप खरारे, मोईन उर्फ मोंटु, ॲड.अंकुश गावंडे, मा.नगरसेवक सय्यद जहांगीर, मो. युसुफ, अंकुश तायडे, हरीश कटारिया, अफरोज लोधी, मंजूर अहमद, अतुल देशमुख, तश्वर पटेल, सय्यद शहजाद उर्फ सज्जू,पंकज देशमुख, शेख अब्दुल्ला, भूषण टाले, ॲड. ओम खंडारे, राहुल सारवान, भगवान बोयत,प्रशांत प्रधान, कशीश खान, अन्नपूर्नेश पाटील, अतुल अमानकर, फिरोज गवली,अहमद लोधी, सय्यद असद अली, नंदकिशोर काळे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.