अकोला जिल्हयातील ०६ तसेच इतर जिल्हाचे ११ असे एकुण १७ गुन्हे उघडकीस आणुन स्थानीक गुन्हे शाखा अकोला यांचे कडुन एक आरोपी जेरबंद”

“अकोला जिल्हयातील ०६ तसेच इतर जिल्हाचे ११ असे एकुण १७ गुन्हे उघडकीस आणुन स्थानीक गुन्हे शाखा अकोला यांचे कडुन एक आरोपी जेरबंद”

आंतराज्यीय टोळीच्या (शटर गैंग च्या) मदतीने गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार स्थानीक गुन्हे शाखा, अकोला यांचे कडून अटक.

बंद दुकाणाचे शटर हाताने उचलून केलेले अकोला जिल्ह‌यातील ०६ गुन्हे उघडकीस

अकोला शहरातील जुने शहर, रामदास पेठ भागातील / मोटार सायकल बुलेट चोरी करून एकाच रात्री ७ते८ शटर उचलून चोरी करणारी अंतर राज्यीय गुन्हेगारांना टिप देणारा महाराष्ट्रातील गुन्हेगार अमरावती जिल्हयातील कापूस तळणी ता. अंजनगाव जि. अमरावती येथील आरोपीस अटक.

अंतरराज्यीय (बुलेट गॅग) शटर उचलून चोरी करनारे अकोला जिल्‌ह्यातील घटनेतील आरोपींचे नावे निष्पन्न.

  • अकोला जिल्हयासह अमरावती (शहर), नागपूर ग्रामीण, वाशीम, हिंगोली, जिल्हयातील बंद दुकाणावे शटर उचलून चोरी केल्याचे

अनेक गुन्हे उघड. दिनांक २९/०२/२०२४ रोजी सकळी अकोला शहरातील अलंकार मार्केट येथील ७ ते ८ बंद दुकाणाचे शटर उचलून चोरी

केल्याची खळबळजनक प्रकार समोर आला होता. घटने दरम्याण ०५ संशयीतांनी शहरातील ७ मोटार सायकली चोरी करून ५ मोटार सायकली सोडून देवून ०७ ते ०८ बंद दकाणाचे शटर उचलून चोरी करून दोन बुलेट मोटार सायकल घेवून फरार झाले होते. या घटनेचे गांभीर्य पाहता मा. पोलीस अधीक्षक साहेब, अकोला श्री. बच्चन सिंह यांनी स्थागुशा प्रमुख श्री. शंकर शेळके यांनी एक पथक गठीत करून आरोपीत लोकांना निष्पन्न करून गुन्हे उघडकीस आनण्या बाबत सुचना दिल्या होत्या. त्या प्रमाणे स्थानीक गुन्हे शाखा, अकोला पथकातील पो. हया फिरोज खान, अब्दुल माजीद, खुशाल नेमाडे, महेंद्र मलिये, पो. अं वसीमो‌द्दीन, आकाश मानकर, अभिषेक पाठक, धिरज वानखडे चाकल पो. हवा प्रशांत कमलाकर यांनी सतत ०९ दिवस अथक परिश्रम घेवून ०५ संशयीतांचा अहमदनगर जिल्‌ह्या पर्यंत माग काढून चोरलेली बुलेट मो.सा जप्त केली होती तेव्हा पासून आजपर्यंत सदर संशयीत ०५ आरोपी बाबत बाहेर जिल्हयात व आंतरराज्यात अश्या प्रकारे गुन्हे करण्याची पध्दत असलेल्या संशयीतांची माहीती संकलीत करून त्यांचे मागावर होते. तांत्रिक विश्लेषना नंतर हैद्राबाद येथील एक ईसम हा संशयीत गैंग चे सोबत अमरावती येथून संपर्कात असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पथकाने अमरावती (ग्रामीण) स्थागुशा यांचे मदतीने संशयीत ईसम नामे फरहान अहेमद अब्दुल गफार वय ३० वर्ष व्यवसाय ड्रायव्हर, रा. चंद्रगुट्टा हैद्राबाद ह. मु ग्राम कापूस लळणी ता. अंजनगाव जि. अमरावती. यास ताब्यात घेवून विचापूस केली असता, त्याने गुन्हा केल्याचे कबुल केली असूतन त्याचे पासून पो. स्टे अकोट फाईल येथील गुन्हयात वापरलेली मोटार सायकल आणि नगदी रक्कमे पैकी त्याचे हिश्यावर आलेले नगदी आणि मोबाईल असा एकुण १,१२,५००/-रू जप्त करण्यात आला आहे. तसेच अकोला जिल्हयातील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असलेला रेकी करून टिप दिलेले अश्या स्वरूपातील खालील प्रमाणे सोबत्यासह गुन्हे केल्याची कबुली दिली.

तसेच दिनांक २९/०२/२०२४ रोजी पो. स्टे समदास पेठ, आणि पो. स्टे जुने शहर हद्‌दीत चोरी करणाऱ्या आरोपीतांची नावे

ताब्यातील आरोपी फरहान अहेमद अब्दुल गफार यांचे कडून निष्पन्न झाले असून सदर आरोपी हे कर्नाटक, तेलंगाणा, आंध्रप्रदेश या राज्यातील असून त्यांना लवकरात लवकर अटक करण्याची तजबीज ठेवली आहे.

तसेच ताब्यातील नमुद आरोपी ह्‌याने त्योच साथीदारासह महाराष्ट्रात ईतर जिल्हयातील खालील चार्ट प्रमाणे एकुण ११ बंद दुकाणाचे शटर उचलून चोरी केली आहे. तसेच महाराष्ट्रत ईतर जिल्हयात सुध्दा चोरी केल्याचे संशय आहे.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे साहेब, पो.नि श्री.

शंकर शेळके स्थागुशा अकोला यांचे मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखा अकोला चे पोउपनि, गोपाल जाधव, राजेश जवरे, पो. हवा फिरोज खान, अब्दुल माजीद, खुशाल नेमाडे, महेंद्र मलिये, पो. अं वसीमोद्दीन, आकाश मानकर, अभिषेक पाठक, धिरज वानखडे चाकल पो. हवा प्रशांत कमलाकर, अक्षय बोबडे, राहुल गायकवाड, रविंद्र खंडारे अविनाश पाचपोर, एजाज अहेमद विशाल मोरे, प्रमोद डाईफोडे, सुलतान पठाण, उमेश पराये, गोकुळ चव्हाण, सतीष पवार, स्वप्नील खेडकर, शेख अन्सार, मो. अमीर, स्वप्नील चौधरी तसेच सायबर पो. स्टे चे आशिष आमले, राहूल सानप, गोपाल ठोंबरे यांनी केली आहे. तसेच सदर कार्यवाही मध्ये अमरावती ग्रामीण स्थागुशा चे पो.नि श्री. किरण वानखडे आणि त्यांची टिम यांनी आरोपीस अटक करण्यास मदत केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.