अकोला व वाशिम जिल्हयातुन मोटर सायकल चोरी करणारा आरोपी सह चोरी गेलेल्या ०२ मोटर सायकल जप्त

दिनांक ०७/०६/२०२३ रोजी पो.स्टे. दहिहंडा येथे फिर्यादी नामे अभिजीत रामदास खोले, वय ३० वर्ष रा. चोहट्टा बाजार ता. जि. अकोला यांचे तक्रारी वरून पो.स्टे. दहिहंडा येथे अप नं. १८७/२०२३ कलम ३७९ भा.द.वि. चा गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयाचा तपास करण्याबाबत मा. पोलीस अधिक्षक सा. अकोला यांनी दिलेल्या सुबनेवरून तसेच त्यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. अकोला चे प्रभारी पो.नि. शंकर शेळके यांनी मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकिस आणणे कामी एक पथक तयार केले. नेमलेल्या पथकास दिनांक १६/०३/२०२४ रोजी गोपनिय बातमी प्राप्त झाली की, पो.स्टे. दहिहंडा येथील मधील चोरी गेलेली मोटर सायकल ही आरोपी नामे दिपक माणीकराव वानखडे वय २९ वर्ष रा. पाचमोरी ता. जि. अकोला यानी चोरी केल्याची खात्रीलायक माहीती मिळाल्यावरून नमुद आरोपी यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हयातील चोरी गेलेली मो.सा. स्प्लेंडर प्लस क. एम.एच. ३० ए.एच ६१४६ ही चोरी केल्याची कबुली दिल्यावरून तसेच त्याचे जवळुन एक TVS रेडीऑन कंपनीची मो.सा. क्र. एम.एच २९ बी.टी. ९९४६ ही सुध्दा मिळुन आल्याने व सदर दुचाकी बाबत माहीती प्राप्त केली असता पो स्टे मालेगाव जि. वाशिम येथील अप क २४/२०२३ कलम ३७९ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल असल्याने आरोपी जवळुन दोन्ही मोटर सायकल कि.अं. १,१५,०००/- रू चा मुददेमाल जप्त करून पुढील तपास कामी आरोपी मुददेमाल पो स्टे दहिहंडा यांचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह सा, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री अभय डोंगरे सा, यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला, पो.उप.नि गोपाल जाधव व पथकातील पोलीस अंमलदार दशरथ बोरकर, गोकुळ चव्हान, फिरोज खान, खुशाल नेमाडे, लिलाधर खंडारे, अन्सार अहेमद, आकाश मानकर, अभिषेक पाठक यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.