अकोला : विविध सामाजिक सेवेत सक्रिय व श्रीराम सेनाचे जिल्हाध्यक्ष ॲड. पप्पू मोरवाल यांची शिवसेना शिंदे गटाच्या शहर प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रतापराव जाधव यांच्या हस्ते व संपर्क प्रमुख, माजी आ. गोपीकिसन बाजोरिया, माजी आ. विपलव बाजोरिया, पूर्वचे जिल्हा प्रमुख श्रीरंग पिंजरकर, पश्चिमचे जिल्हा प्रमुख पश्चिम अश्विन नवले, म
उषा विरक आदीच्या उपस्थीतीत अॅड. मोरवाल यांना नियुक्तीपत्र प्रदान करीत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुकास्तरीय नियुक्तीदेखील करण्यात आल्या आहेत. ‘सदस्य जोडो’ अभियान राबविण्यात येणार असून
शहर कार्यकारणी लवकरच गठीत करण्यात येणार असल्याचे ॲड.मोरवाल यांनी यावेळी सांगितले.