अकोला जिल्हयातील पोलीस अधीक्षक मा. श्री. बच्चन सिंग साहेब यांचे संकल्पनेतुन व पोलीस -निरीक्षक सुनिल किनगे वाहतुक नियंत्रण शाखा अकोला यांचे मार्गदर्शनात शहर वाहतुक नियंत्रण शाखा, अकोला व अकोला जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत भरधाव वेगाने व धोकादायक रित्या वाहन चालविणारे यांचेवर कलम १८४ मोवाका प्रमाणे नियमांचे उल्लंघन करणारे वाहनांवर कार्यवाही करण्याकरीता संपूर्ण अकोला जिल्हयात दिनांक ०४/०४/२०२४ ते १३/०४/२०२४ दरम्यान विशेष मोहीम राबवीण्यात आली होती.
सदर मोहीम दरम्यान शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला व जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी व अमंलदार यांचेकडुन भरधाव वेगाने व धोकादायक रित्या वाहन चालविणारे यांचेवर कलम १८४ मोवाका अन्वये एकुण २०४ वाहनांवर केसेस करण्यात आले असुन नमुद सर्व प्रकरणे न्यायालयात पाठविण्यात आले आहेत.
करीता वाहन धारकांनी वाहन चालवितांना भरधाव वेगाने व धोकादायक रित्या आपले वाहन चालवु नये. उल्लंघन केल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल व वाहन निलंबन प्रस्तवा उपप्रादेशिक परिवहन बिभाग अकोला यांचे कार्यालयात सादर करण्यात येईल, तसेच वाहन चालवितांना सोबत वाहनांचे कागदपत्रे बाळगावे, वाहतुक नियमांचे पालन करावे व आपले वाहनावर पेंडीग दंड असल्यास त्वरीत वाहतुक पोलीस किंवा शहर वाहतुक कार्यालय येथे दंड भरावा, असे आवाहन मा. श्री. बच्चन सिंग साहेब पोलीस अधीक्षक अकोला यांनी अकोल जिल्हयातील नागरीकांना केले आहे.