अकोला शहरात रात्री उशीरापर्यंत सुरू असणाऱ्या एकुण १० आस्थापनांवर मुंबई पोलीस अधिनीयम अंतर्गत कार्यवाही

अकोला शहर अती संवेदनशिल म्हणुन ओळख आहे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा, आगामी सन उत्सव व सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांचे अनूषंगाने मा. पोलीस अधीक्षक सा. यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक २९.०३.२०२४ चे रात्री २०.३० ते २३.०० वा पावेतो पो.स्टे. रामदासपेठ व जुने शहर हद्दीत एकुण ९ ठिकाणी आकस्मीक नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते. नाकाबंदी करीता ९ अधिकारी, ४१ पोलीस अंमलदार, दामिनी पथक, ९ होमगार्ड व मोटार वाहन केसेसकरीता वाहतुक शाखेचे ९ अंमलदार नियुक्त करण्यात आले होते.

नाकाबंदी दरम्यान पो.स्टे. रामदासपेठ व जुने शहर हद्दीतील एकुण ९ ठिकाणी ३२८ वाहने चेक करून ६८ वाहनांवर दंडात्मक कार्यवाही करून ३५३५०/-रू. दंड वसुल करण्यात आला. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलीस कायदानुसार एकुण ८ कारवाई करण्यात आल्या. तसेच क. २२९ अ भादविनुसार १ कारवाई करण्यात आली. रात्रगस्त दरम्यान शहरातील रात्री उशीरापर्यंत सुरू असलेल्या एकुण १०

आस्थापणांवर मुंबई पोलीस अधिनियम क. ३३ (r) (w) नुसार कारवाई करण्यात आली.

याव्दारे सर्व नागरीकांना आव्हाहन करण्यात येते की, सर्वांनी वाहतुक नियमांचे पालन करावे. काही तक्रारी असल्यास डायल ११२ वर संपर्क करावा. तसेच आस्थापना धारकांनी आपली आस्थापने नियोजीत वेळेत बंद करून पोलीसांना सहकार्य करावे. तसेच आस्थापना वेळेत बंद झाल्यामुळे रस्त्यावरील वरदळ कमी होण्यास मदत होईल. आगामी निवडणुक संबंधाने लागु असलेल्या आचार संहीतेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. शहरातील कायदा व सुव्यवस्था भंग होणार नाही याकरीता सोशल मिडीयावर आक्षेपार्ह मजकुर/फोटो पोस्ट करू नये. कुठे काही आक्षेपार्ह काही आढळून आल्यास तात्काळ संबधीत पोलीस स्टेशन / पोलीस नियंत्रण कक्ष अकोला यांचेशी संपर्क करावा.

Leave a Reply

Your email address will not be published.