डाबकी रोड हददीतील सिगरेट गोडावून वरील चोरी करणारे आरोपिंचा पर्दाफाश..

५४,१८,१५० रु चा मुददेमाल हस्तगत

स्थानिक: अकोला जिल्हयात पोलीस स्टेशन डाबकी रोड हदद्तील राधा स्वामी सत्संग चे बाजुला असलेले मनोहर मोटवाणी याचे सिगरेट चे गोडावून वर दि. २८/०५/२०२३ रोजी रात्री ०२ दरम्यान चौकीदार यांचे बळजबरी हातपाय बांधुन गोडावुन चे शटर वाकवुन गोडावून मध्ये 50, 00,000/- रू चा मुद्देमाल अज्ञात ०३ चोरटयानी जबरी ने चोरून नेल्या बाबत पोलीस स्टेशन डाबकी रोड येथे २८/०५/२०२३ रोजी अप क १३३ / २०२३ कलम ३९२, ३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.  पोलीस अधिक्षक सदीप घुगे सा. व अपर पोलीस अधिक्षिका अभय डोंगरे सा, अकोला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक  संतोष महल्ले व स्थानिक गुन्हे शाखा, अकोला येथील अधिकारी व कर्मचारी यांना जबरी चोरी गुन्हा उघडकीस आनणेबाबत सुचना दिल्या होत्या, त्यानुसार दिनांक २३/०६/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांना गुप्त बातमी दारा कडुन माहीती मिळाली की, गोडवून मधील सिगरेट जबरीने चोरून नेणा-या तिन आरोपीन पैकी एक आरोपी आतीश सुनील मलीये हा आहे. त्यावरून त्याचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेतले, विश्वासात घेवुन कौशल्यपूर्वक बारकाईने विचारपुस केली असता त्याने त्याचे मीत्र यांनी गोडावून मध्ये असलेला ITC विविध कंपनीची सिगरेट जबरीने चोरून नेली बाबत कबुली देवुन सदर गुन्हयात एकुण १) आतीश सुनिल मलीये रा. गौसीया मज्जीद गुलझारपुरा अकोला २) भावेश गजानन भिरड  रा. गायत्री नगर जुने शहर अकोला ३) शाम सुखदेव ताथोड,  रा. गायत्री नगर जुने शहर अकोला ४) नागेश विजय कुटाफळे,  रा. शिवचरण पेठ, जुने शहर अकोला यांना ताब्यात घेवुन त्यांचे कडुन विविध ITC कंपनीचे सिगारेट कीमंत एकुण ४३,७७,८५०, दोन चार चाकी मालवाहू वाहन की अं ८,००,०००/-रू, दोन मोटार सायकल की अं २,००,००० /-रू, ४ विविध कंपनीचे मोबाईल की अं ४०,०००/-रू, दोन चाकु की अं ३००/-रू एकुण ५४,१८,१५० /- रू चा मुद्देमाल आरोपीतांन कडुन आला. पुढील तपास डाबकी रोड येथील पोलीस स्टेशन यांच्या कडे सोपविण्यात आला.

सदरची कार्यवाही  पोलीस अधिक्षक  संदिप घुगे सा, अपर पोलीस अधिक्षक, अभय डोंगरे, यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, स्थानिक गुन्हे शाखा, सब पोलीस निरीक्षक गोपाल ढोले,पोलीस अंमलदार फीरोज खान, खुशाल नेमाडे, आकाश मानकर, अभीषेक पाठक, धिरज वानखडे, चालक हेमंत दापरवार यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published.