AC व Fridge चोरी करणारा आरोपी जेरबंद:अकोट फाईल येथून मुद्देमाल जप्त

पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अकोला यांची कार्यवाही

पोलीस स्टेशन सिटीकोतवाली अकोला येथे अग्रवाल इलेक्ट्रॉनिक दुकान चे मालक नामे यश संजय अग्रवाल रा. राधे नगर अकोला यांनी त्यांचे मालकीचे नागपुरी जिन अकोला येथील त्यांचे गोडाउन मध्ये ठेवलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तु ओसी, फिझ ची नेहमीप्रमाणे दि. २६/०३/२०२५ रोजी सकाळी ११/०० या पाहणी केली असता गोडाउन मधील माल हा कमी दिसत आहे त्यावर त्यांनी आलेल्या स्टॉक लिस्ट ची पाहणी केली तर त्यांचे लक्षात आले की गोडाउन मधुन १) एल जि १.५ टन ३ स्टार ड्युल ईव्हर्टर (इनडोअर व आउट डोअर पुर्ण सेट) वे एकुण ०६ नग प्रत्येकी कि.अं.४५०००/- रु एकुण २,७०,०००/- रू २) एल जि १.५ टन ५ स्टार डयुल ईव्हर्टर (इनडोअर व आउट डोअर पुर्ण सेट थे एकुण ०१ नग कि.अं.५५,०००/- रू ३) एक एल जि फिज २०१ लिटर किं. अं. २५,०००/- रू, ४) एक एल जि चे फिज १८५ लिटर कि. अं.२०,०००/-रू असा एकुण ३,७०,०००/- रू चा मुददेमाल असा दि. ०१/०२/२०२५ ते दि. २६/०३/२०२५ रोजी या कालावधील कोणीतरी अज्ञात इसमाने गोडाउन मधुन चोरून नेला आहे अशा फिर्याद वरून पो.स्टे. सिटीकोतवाली अकोला येथे अप.नं. ८०/२०२५ कलम ३०५ (अ) बी.एन.एस प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला.

सदरचा गुन्हा उघडकीस आनण्याकरीता डी.बी पथकाला सुचना दिल्या व पथक रवाना केले सदरचे घटणास्थळावरील सी.सी.टी.व्ही फुटेज वी पाहणी करून व आम्ही ठाणेदार श्री. सुनिल वायदंडे आम्हास मिळालेल्या गुप्त माहीती वरून सदरचा अनोळखी इसम हा अकोट फाईल अकोला या परीसरात राहत असल्याची खात्रीलायक माहीती मिळाल्यावरून गुप्त माहीतीच्या आधारे तपासाचे बके फिरवुन संशयीत आरोपी नामे मोहम्मद रफीक मोहम्मद युसुफ वय २३ वर्षे रा. भारत नगर अकोट फाईल अकोला यास ताब्यात घेवुन त्याची कसुन चौकशी केली असता त्याने सुर्वातीला उडवा उडवीची उत्तरे दिली तरी त्यास विश्वासात घेवुन पुंन्हा कसुन चौकशी केली असता त्याने गुंन्हयाची कबुली दिली व गुंव्हयात चोरी केलेला मुददेमाल १) एल जि १.५ टन ३ स्टार डयुल ईव्हर्टर (इनडोअर व आउट डोअर पुर्ण सेट) चे एकुण ०६ नग प्रत्येकी कि.अं.४५०००/- रु एकुण २,७०,०००/- रू २) एल जि १.५ टन ५ स्टार डयुल ईव्हर्टर (इनडोअर व आउट डोअर पुर्ण सेट) चे एकुण ०१ नग कि. अं. ५५,०००/- रू ३) एक एल जि फिज २०१ लिटर किं. अं. २५,०००/- रू, ४) एक एल जि वे फिज १८५ लिटर कि.अं.२०,०००/- रू असा एकुण ३,७०,०००/- रू वा मुददेमाल हा काढून दिला व सदरचा मुददेमाल जप्त करून आरोपीस दि. २८/३/२५ रोजी अटक कार्यवाही करून गुन्हा उघडकीस आनला आहे.

सदरची कार्यवाही मा. श्री. बच्चन सिंह, पोलीस अधिक्षक सा, अकोला, मा. श्री. अभय डोंगरे सा. अप्पर पोलीस अधिक्षक, मा. श्री. सतिष कुळकर्णी सा. उपविभागीय पोलीस अधिकारी शहर वि. अकोला यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. सुनिल वायदंडे, स.पो.नि. किशोर पवार, डी. बी. पथक अंमलदार पोहेकों अश्विण सिरसाट, अजय भटकर, ख्वाजा शेख, किशोर येउल, पो.कॉ. निलेश बुंदे, शैलेश घुगे पो.स्टे. सिटी कोतवाली यांनी केली गुंन्हयाचा पुढील तपास पोहेकों अश्विन सिरसाट हे करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published.