अशी ही.. समाजसेवा; तेरवीच्या पैशातून दिले विहाराला लाऊड स्पीकर दान

अकोला :

स्थानिक तार फाईल येथील रहवासी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष, वंचितांचा प्रकाश या साप्ताहिकाचे मुख्य संपादक तथा समाजसेवक महेंद्र डोंगरे यांची आई काल. आनंदीबाई डोंगरे यांचे दिनांक १८ डिसेंबर २०२४ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. डोंगरे परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला संपूर्ण जिल्हा शोकाकुल झाला असून सर्व या दुःखामध्ये महेंद्र भाऊ डोंगरे यांच्या परिवारासोबत आहेत अशी भावना व्यक्त करत आहेत.

महेंद्र भाऊ डोंगरे यांनी सर्व चालत असलेल्या रुढी परंपरा यांना बाजूला सारून एक विधायक कार्य व्हावे झालं पाहिजे यासाठी नव्या युगाचा नवीन पायंडा पडला पाहिजे या हेतूने आपल्या आईची कुठल्याही प्रकारची तेरवी न करता त्यामधून जमा झालेल्या निधीमधून तार फाईल येथील संघर्ष महिला मंडळ बुद्ध विहाराला त्यांनी लाऊड स्पीकर दान दिले. संपूर्ण समाजासाठी ही एक आदर्श अशा पद्धतीची शिकवण आहे. यामधून सर्वांनी एक आदर्श घ्यावा, बोध घ्यावा त्यानुसार वाटचाल करावी अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी धम्म दान स्वीकारण्यासाठी संघर्ष महिला मंडळ सदस्य सुषमा अरूण भालेकर,माया अरूण गजाभीये, मेघा राजु मेश्राम, शितल संजय राऊत, उषा संदिप रंगारी,करुणा दिलीप मेश्राम,स्वाती युवराज गजभिये,सुनिता मुकेश खोब्रागडे,माधुरी रोशन गजभिये,रिना विशाल गजभिये,ललीता सुनिल मेश्राम,शिल्पा राजेंद्र घुटके,सुषमा शेखर रंगारी,अल्का राजेश बनसोड,सविता राजु चव्हाण,कविता भारत वानखडे,अकांक्षा अनिकेत गजभिये, ललिनाबाई गोपाल खोब्रागडे, फुलवंताबाई नारायण गजभिये,कांताबाई नरेश गजभिये, प्रज्ञा मनोज मेश्राम,निर्मला वसंता बोबाडे, किरण महेंद्र डोंगरे, अंतकला महाजन गजभिये, जोरना भाऊराव गजभिये, संगीता प्रेमसुत गजरे, सदेशना शितल मेश्राम, विघ्या सागर वानखडे,माधुरी राष्ट्रपाल गजरे,ममता माधव चव्हान,सरला रविद्र डोंगरे,वर्षा सुरेश ऊके, प्रेरणा केलन गजभिये आदी उपस्थित होते.

त्यावेळी डोंगरे परिवारातील कांताआई डोंगरे, रवींद्र डोंगरे, महेंद्र डोंगरे, सरला डोंगरे, किरण डोंगरे, सुरेश बोरकर,सुनिता बोरकर, वनिता मेश्राम, अनिता बोरकर, निर्मला बोंबार्डे आदी परिवारातील सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.