स्थानिक: अकोला जिल्हयामध्ये मा. पोलीस अधिक्षक श्री. संदीप घुगे सा. तसेच मा. अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक कक्ष महीला व बाल अत्याचारासंदर्भाने कलम ३६३, ३६६ (अ) भादवि तसेच महीला मिसिंग चा तपास करत आहे. अनैतिक मानवी वाहतुक कक्षाने आज पावेतो एकुण ६१ गुन्हे व ३१ मिसिंग असे एकुण ९२ प्रकरणे उघडकिस आणले आहेत.पोलीस स्टेशन बाळापुर जिल्हा अकोला येथील अप क १०४ / २३ कलम ३६३ भादंवी चा गुन्हा दाखल असुन मा. पोलीस अधिक्षक सा यांचे आदेशाने अनैतिक मानवी वाहतुक कक्ष येथे समांतर तपास सुरू होता. तपासादरम्यान सदर गुन्हयातील पिडीत बालीका हीचा मिळालेल्या माहीती नुसार पुणे येथे शोध घेतला असता आरोपी व पिडीत मिळुन आले. पोलीस स्टेशन अकोट शहर अप नं ५५१ / २२ क ३६३ भादवि चा गुन्हा १७ महीण्यापासुन पेन्डिंग होता.
सदर गुन्हयाच्या तपासादरम्यान गुन्हयातील आरोपी व पिडीत बालीका हे मोशी पुणे येथे राहत असल्याबाबत खात्रीलायक बातमी मिळाल्याने पिडीत व आरोपी यांचा कसून शोध घेतला असता ते मोशी पुणे येथे मिळुन आले. तसेच पो स्टे चान्नी मिसिंग क ०२ / २३ चे तपासादरम्यान मिसिंग महीला ही आळंदी देवाची येथे राहत असल्याबाबत माहीती मिळाल्याने तेथे जावुन मिसिंग महीलेचा शोध घेतला असता आळंदी देवाची येथे मिळुन आली.
वरील गुन्हयातील पिडीत मुलीं व आरोपी यांना पुढील कार्यवाही कामी पोलीस स्टेशन चे ताब्यात दिले.सदर कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक श्री. संदीप घुगे सा तसेच मा. अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे, मा. पोलीस उपअधिक्षक नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपरोक्त कामगिरी ही पोउपनि विजय खर्चे, पोहेकॉ सुरज मंगरूळकर, पोहेकॉ धनराज चव्हाण, पोहेकॉ आशिष अघडते, मपोका पुनम बचे, मपोकॉ सिमा तायडे पोकॉ गोपाल ठोबरे, आशिष आमले वाहन चालक पोकॉ अजय राजपुत, अमोल मस्के यांनी केली असुन लवकरच इतर गुन्हयामध्ये सुध्दा तत्परतेने पिडीत मुली व आरोपी यांचा कसून शोध घेऊन गुन्हयांचा निपटारा अनैतिक मानवी वाहतुक कक्ष अकोला करित आहे.