
७ फेब्रुवारी सन २००० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही ८ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध द्वितीया शके १५४९) या तारखेप्रमाणे साजरी केली जात होती, मात्र भाजपा सरकार ने महाराष्ट्र विधी मंडळात कोणतीही चर्चा न घडवून आणता ८ फेब्रुवारी सन २००० रोजी १९ फेब्रुवारी १६३० (फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१) या तारखेला मान्यता देऊन जन्मतारीख व जन्मवर्षाचा घोळ निर्माण केला, त्यानंतरच सन २००४ साली भांडारकर संस्थेच्या ब्राम्हण मंडळींनी (ज्यात RSS चे ब. मो. पुरंदरे हे देखील होते) परदेशी लेखक जेम्स लेन ला पुढं करून माँसाहेब जिजाऊंचे चारित्रहनन केले. तारीख बदलणे व बदनामीकारक पुस्तक लिहून घेणे या दोन्ही घटनांच्या मागे आरएसएस-भाजपाच्या ब्राम्हणांचा मेंदू होता आणि भाजपाचे नेता अटल बिहारी वाजपेयी यांनी बदनामीत सहभागी असणाऱ्या ब्राम्हणांची पाठराखण केली होती. काही ब्राम्हणांनी भांडारकर संस्थेला पेशे पुरविले होते आणि काही ब्राम्हणांनी त्या पुस्तकावरील बंदी उठविण्यासाठी विशेष पुढाकार घेतला होता. ब्राम्हणांच्या पुढाकारामुळेच त्या विवादित पुस्तकावरील बंदी उठविण्यात आली. सन १९६६ साली महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराज जन्मतिथी निर्णय समिती गठीत करून वादाचे समाधान करण्यऐवजी राजवाडे आणि टिळक यांनी सुचविलेल्या तारखेकडे कल दिला आणि पुन्हा वादात भर टाकली. २ विरुद्ध ५ अश्या तन्हेने मत विभाजन झाले मात्र वादाचा काही निकाल लावण्यात आला नाही. टिळक व राजवाडे यांनी बनावट कागदपत्रे पुढे करून जे षडयंत्र आखले त्याला उलटपक्षी मान्यता दिली गेली, मात्र समितीच्या सर्व सदस्यांमध्ये एकमत नाही ही बाब सांगून शासनाच्या शासन समारंभाच्या सोईसाठी जुनी तिथी म्हणजे वैशाख शुध्द
द्वितीया शके १५४९ (इ. स. १६२७) ही तारीख चालू
ठेवण्याचा निर्णय समितीने सरकारला सुचविला. ३२-३४ वर्षांनंतर भाजपाने शिवजयंतीच्या तारखेचा
वाद नवीन इतिहास संशोधकांची समिती गठित करून
सोडविण्याऐवजी हुकूमशाही पद्धतीने १९ फेब्रुवारी ही तारीख
महाराष्ट्र तसेच देशाच्या जनतेवर थोपविली. केवळ
जन्मतारखेचाच वाद नाही तर जन्म वर्षाचा देखील वाद
आहे यामुळे या वादाचे समाधान करण्यासाठी भारत मुक्ती
मोर्चा व छत्रपती क्रांती सेना या संघटनेच्या वतीने १२
जानेवारी २०२३ ला पुण्यामध्ये या मुद्याला घेऊन इतिहास
परिषदेचे आयोजन कैले होते ज्यामध्ये इतिहासाचार्य ऍड.
अनंत दारवटकर यांनी ८ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध द्वितीया
शके १५४९) ही तारीख सिद्ध करण्यात आली. विशेष म्हणजे
महात्मा राष्ट्रपिता जोतिबा फुले यांनी देखील ८ एप्रिल १६२७
याच तारखेला मान्यता दिली आहे व सत्यशोधक चळवळ
देखील ८ एप्रिललाच शिवजयंती साजरी करीत असत. १९
फेब्रुवारी गोळवलकर ची जयंती आहे, म्हणून १९ तारीख पुढं
करून छत्रपती शिवाजी महाराज यांना तीन वर्षे उशिरा
जन्माला दाखवून इतिहासाचे विकृतीकरण आणि
माँसाहेबांचे चारित्रहनन करण्याचा मूळ हेतू आहे. छत्रपती
क्रांती सेना व भारत मुक्ती मोर्चा ने ८ एप्रिल १६२७ हीच खरी
जन्मतारीख व जन्मवर्ष आहे हे घोषित केल्यानंतरच प्रतिक्रिया म्हणून खोट्या जन्मतारखेळा मान्यता मिळावी व
जनविद्रोह होऊ नये म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने नरेंद्र मोदी यांना पुरस्कार देण्याचे ठरविले आहे.
ज्यांनी जेम्स लेन चा मित्र व. मो. पुरंदरेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार जनतेला बंदुकीचा धाक दाखवून दिला म्हणून मोदीचा सन्मान केला जात आहे? महाराष्ट्रात पक्ष फोडले व दंगली घडवून आणल्या म्हणून मोदीला पुरस्कार दिला जात आहे?
वर्तमान आरएसएस-भाजपा देशभरामध्ये ठिक ठिकाणी धार्मिक उन्माद निर्माण करीत आहे, महाराष्ट्रात ही बऱ्याच जिल्ह्यात धार्मिक वाद निर्माण केले गेले. अल्पसंख्यक ब्राम्हणांना बहसंख्यक बहजनांची मते मिळविण्यासाठी धार्मिक विवाद किंवा दैगली घडवून आणत असतात जेणेकरून मताचे धार्मिक ध्रुवीकरण केले जावे. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास लोकांना सांगून त्यांची माथे भडकविले जातात, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास हा बहजन समाजाचे ऐक्य घडवून आणणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची लडाई ही न्यायासाठी, रयतेच्या कल्याणाची होती. त्यांच्या सैन्यात मुस्लिम सैन्य देखील होते, छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक आणि विश्वासू मुस्लिम होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तविक गुरु संत तुकाराम महाराज व सुफी परंपरेतील बाबा याकूत हे होते. भट रामदास व दादू कोंडदेव गुरु असल्याचा एकही पुरावा इतिहासात सापडत नाही. रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नसल्याचा निकाल मुंबई हाई कोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने सन २०१८ साली दिलेला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे इ. स. १६६९ ला विदर्भातील कारंजा येथे आले असता त्यांनी बाळापूर ला देखील भेट दिली होती. छत्रपती शिवाजी महाराज धार्मिक स्थळांना त्रास देत नसत व त्यांचा आपल्या सैन्यांना सक्त सूचना होत्या की दर्गा-मशिदी यांना देखील हाथ लावू नये. बाळापूर येथील खानकाह नक्षबंदी ला छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट दिली तिथे त्यांना नक्षबंदीच्या प्रमुखाने आतमध्ये घेऊन गेले आणि त्यांना दाखविले की तेथे कशाप्रकारचे काम चालते तिथे गरिबांना मोफत शिक्षणाची व्यवस्था आढळली तेथे शिक्षण व ग्रंथालयाची व्यवस्था असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या खानकाह ला ग्रंट दिली, विशेष म्हणजे तीन गाव- चित्तोळा, अंबिकापूर आणि लासुरा या गावांची जहागिरी खानकाह ला देण्याचा आदेश महाराजांनी दिला. तसेच इतरही ठिकाणच्या जहागिरी देण्यात आल्या आणि त्या ठिकाणच्या जमीनीचे उत्पन्न कायमचे बांधून दिले. एवढेच नव्हे तर दररोज एक रुपये याप्रमाणे कुतुब खाणकाह ए नक्षबंदी यास देण्याचा आदेशही छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. यावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण कसे होते हे दिसून येते. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसांनी देखील ती परंपरा पुढे चालविली आणि सन- १९६९ पर्यंत या खानकाह ला ग्रंट चालू होते. सध्या महाराष्ट्रात व
देशात मदिर-मशिद चा वाद उभा करून देशभरामध्ये अशांतता व अराजकता निर्माण करण्याचे काम आरएसएस-भाजपचे ब्राम्हण करीत आहेत आणि त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा देखील ते दुरुपयोग करीत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचा वास्तविक इतिहास लोकांना समजावा आणि इतिहासाचे विकृतीकरण थांबवावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास तमाम मूलनिवासी बहजनांनी उपस्थित राहून शिवरायांचा वारसा पुढे चालवावा आणि त्यांचे वैचारिक वारसदार सिद्ध व्हावे.