
स्थानिक : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर आणि बार्शीटाकळी येथील तरुणांसाठी आनंदाची बातमी, तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटी तर्फे येत्या २३ जुलै रोजी सकाळी ९:०० वाजता मुर्तिजापूर येथील श्री. गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, मेन रोड, मुर्तिजापूर येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये सातवी ते पदवीधारक तरुणांना सहभागी होता येणार आहे, मुर्तिजापूर व बार्शीटाकळी येथील जास्तीत जास्त तरुणांनी या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याचे आव्हान तीक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटी चे अध्यक्ष उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुगत वाघमारे यांनी केले आहे.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुमारे ५० कंपन्यांचा सहभाग पाहायला मिळेल. मेळाव्यास उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडे नोंदणी अर्ज आणि बायोडेटा आवश्यक आहे.
७ वी ते पदवी, पदविका व सर्व क्षेत्रातील उमेदवारांना अर्ज करता येईल.
त्यासाठी ऑफलाईन नोंदणी अर्ज प्राप्त करण्यासाठी तीक्ष्णगत कार्यालय, कोहिनूर हार्डवेअर समोर, गोयनका नगर, मुर्तिजापूर येथे संपर्क साधावा.