अकोला:
धम्मधारा बुध्दवीहार ह्या ठिकाणी सत्यशोधक च्या टीम ने केले चित्रपट बघण्याचे आवाहन. नगरातील विद्यार्थी व विद्यार्थिनी घडून त्यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले पाहिजे, तसेच संविधानाच्या रक्षणासाठी श्रध्देय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे या उद्दात हेतूने प्रबोधन करत सत्यशोधक चित्रपटातील महीला कलाकार निताताई खडसे , किरण ताई डोंगरे ,नीतीमा ताई जाधव ह्यांनी सावित्रीबाई फुले यांचा विचार घरोघरी पोहचवणे हे गरजेचे आहे असे म्हणत आव्हान केले.
कार्यक्रमाचे आयोजन राजेश मुधावने यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगलाताई मुधावने होते. तहसीलदार राहुल तायडे व सत्यशोधक चित्रपटांचे निर्माते राहुल वानखेडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले. धम्मधारा बुध्द वीहारासाठी पुस्तके कपाट व इतर साहित्य देण्यासाठी पुरनपने मदत करनार असल्याचे सांगितले. प्राचार्य समाधान कंकाळ यांनी मदतीचे आवाहन केले. भारतीय बोध्द महासभा संघटक इंगळे सर यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाची सुरुवात वीलास भाऊ इंगोले तर सुत्रसंचलन अवधूत खडसे यांनी केले व आभार प्रदर्शन धम्मधारा बुध्दवीहार महीला संघाच्या सदस्य सौ. प्रविना ताई मनवर यांनी केले.
त्यावेळी चित्रपटाचे निर्माते राहुल वानखेडे आणि तहसीलदार राहुल तायडे आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य समाधान कंकाळ, वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष तसेच महेंद्र डोंगरे,भुषन ताजने , भारतीय बोध्द महासभा संघटक इंगळे, धम्मधारा बुध्दवीहार बांधकाम समिती अध्यक्ष विलास इंगोले, वंचित बहुजन आघाडी चे महानगर उपाध्यक्ष डॉ. सुनील सिराळे ,प्रविण डोंगरे , भीमराव मनवर ,कडु भाऊ ,वसंतराव भगत ,श्रावन इंगोले, आकाश भगत ,कीरन अरकराव,उमेश इंगोले, ज्ञानेश्वर गायकवाड, राजेश मनवर,अशोकराव काजळे व इतर कार्यक्रते व धम्मधारा महीला संघ प्रामुख्याने उपस्थित होत्या.