अकोला | दि. २६ जानेवारी २०२६
७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आकाश डोंगरे मित्र परिवारातर्फे शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिराचे उद्घाटन आकाश डोंगरे, भैयू पाटील, बजरंग नागे व ॲड. नरेंद्र बेलसरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून साई जीवन ब्लड बँकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटणकर व त्यांची संपूर्ण वैद्यकीय टीम उपस्थित होती.
“रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, तरुणांच्या एका रक्ताच्या थेंबामुळे कोणाचे तरी प्राण वाचू शकतात,” असे आवाहन आकाश डोंगरे यांनी यावेळी केले.
सकाळपासून युवक व मित्र परिवारातील सदस्यांनी रक्तदानासाठी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे प्रथमच रक्तदान करणाऱ्या युवकांची संख्या लक्षणीय होती. दिवसभरात एकूण ५५ पेक्षा अधिक रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या.
रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन तसेच अल्पोपहाराची व्यवस्था करून गौरविण्यात आले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी सुरज मकोरिया, शुभम गोळे, प्रदीप काशीद, सोनू यादव, सोनू निवारे,अमित यादव, सुमित रक्षक, आकाश काशीद, योगेश गवळी, चिंटू शिरसाठ, प्रेम जाधव, मंगेश शिरसाठ आदींनी विशेष परिश्रम घेतले.
या सामाजिक उपक्रमाचे परिसरात तसेच प्रभागात मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

